घरताज्या घडामोडीजामखेडला दरोडा ; २२ तोळे सोन्यासह दोन लाख लांबवले

जामखेडला दरोडा ; २२ तोळे सोन्यासह दोन लाख लांबवले

Subscribe

मिरजगावमध्येदेखील दरोडेखोरांनी तीन लाखांचा ऐवज लांबवला

जामखेड शहरातील नगररोडवर असलेल्या पोकळेवस्तीवरील तात्याराम पोकळे यांच्या घरावर पहाटे अडीचच्या सुमारास दरोडा पडला. या घटनेत रोख दोन लाख रुपयांची रोकड व २२ तोळे सोने असा मोठा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहेे. मिरजगावमध्येदेखील दरोडेखोरांनी दरोडा टाकत तीन लाखाचा ऐवज लंपास केला.

मंगळवारी पहाटे एक ते तीन वाजेच्या सुमारास पोकळेवस्तीवर हा दरोडा पडल्याचा अंदाज आहे. दरोडेखोरांनी तात्याराम पोकळे यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले. घरातील सर्वजण झोपेत असतानाच ही चोरी झाली आहे. पोकळे यांच्या आई पहाटे ऊठल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

- Advertisement -

जामखेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने, अमरजित मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. श्वानपथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले असून जामखेड पोलीस वेगाने तपास करत आहेत.

मिरजगावलादेखील दरोडा

मिरजगाव येथे देखील शिंगवी काॅलनीत राहणाऱ्या अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी कोरडे यांच्या घरातील तीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची माहिती मिळाली. येथेदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देत माहिती घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञाची मदत घेत पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -