घरदेश-विदेशVideo: जग कोरोनाने हैराण, पण चीन करतंय फुटबॉल स्टेडियम बांधण्याची तयारी!

Video: जग कोरोनाने हैराण, पण चीन करतंय फुटबॉल स्टेडियम बांधण्याची तयारी!

Subscribe

कोरोना सारखे मोठे संकंट देशावर ओढावले असताना चीनने मात्र आपल्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरूवात केली

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असल्याने सगळेच कोरोनाने हैराण झाले आहे. मात्र कोरोना सारखे मोठे संकंट देशावर ओढावले असताना चीनने मात्र आपल्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यास सुरूवात केली आहे. चीन मधील वुहान मधून जगभर पसरलेला हा कोरोना व्हायरस सगळीकडे हातपाय पसरत असताना चीन जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम बांधकाम करण्याच्या तयारीला लागला आहे.

- Advertisement -

अशी आहे भव्य रचना

हे जगातील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम असून याचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे. प्रोफेशनल क्लब ग्वांगझू (Guangzhou) ही टीम एव्हरग्रेंड (Evergrande) येथे हे भव्य स्टेडियम उभारणार आहे. हे पुर्णतः तयार होण्यासाठी साधारण १३ हजार कोटी रूपये खर्च येणार असून या स्टेडियममध्ये एकाच वेळी १ लाख लोकं बसण्याची आसन व्यवस्था करण्यात य़ेणार आहे.

- Advertisement -

हे स्टेडियम २०२२ पर्यंत तयार करण्यात येणार असून या स्टेडियममध्ये १६ व्हीव्हीआयपी खोल्यांची सोय असणार आहे. तर १५२ व्हीआयपी खोल्या असतील. या स्टेडियममध्ये फिफा क्षेत्र आणि अॅथलॅटिक क्षेत्र देखील असणार आहे. स्टेडियममधील विविध सामन्याचे कव्हरेज करणाऱ्या माध्यमांसाठी वेगळे प्रेसरूमची देखील व्यवस्था येथे तयार केली जाणार आहे.

सध्या जगातील सर्वात मोठे स्टेडियम स्पॅनिश क्लब बार्सिलोनाचा कॅम्प नाऊ स्टेडियम आहे. त्याची क्षमता ९९ हजार ३५४ इतकी आहे. मात्र या स्पॅनिश क्लबला आणखी दोन स्टेडियम बांधण्याची इच्छा आहे.


लॉकडाऊनमुळे नैनीतालच्या तलावाचे सौंदर्य खुलले; ३ पटीने पाणी झाले पारदर्शक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -