घरदेश-विदेशचायनीज मोबाईलमुळे भारतीय मोबाईलचा बाजार गडगडला...

चायनीज मोबाईलमुळे भारतीय मोबाईलचा बाजार गडगडला…

Subscribe

सध्या प्रत्येकाला स्मार्टफोन्सची गरज आहे. खिशाला परवडेल अशा दरांमध्ये लोकांना फोन हवे असतात.त्यामुळे ते चायनीज कंपन्यांचे फोन खरेदी करण्यासाठी सरसावतात.

स्वस्तात मस्त फोन देणाऱ्या चायनीज कंपन्यांच्या मोबाईलमुळे आणि त्यांच्यावर देण्यात आलेल्या भरघोस डिस्काऊंटमुळे भारतीय बनावटीच्या मोबाईल्सना बुरे दिन आले आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न घेऊन सुरु झालेल्या ‘लावा’ कंपनीचा सध्या वाईट काळ सुरु आहे. इतका वाईट काळ की, या कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगार थकला आहे. त्यामुळे आता या स्पर्धेच्या युगात या मोबाईल कंपनीचा निभाव लागेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाचा- अमेझॉन- फ्लिपकार्टला देणार टक्कर ‘गुगल’ची शॉपिंग वेबसाईट

चायनीज कंपन्यांनी वाढवली स्पर्धा

सध्या प्रत्येकाला स्मार्टफोन्सची गरज आहे. खिशाला परवडेल अशा दरांमध्ये लोकांना फोन हवे असतात.त्यामुळे ते चायनीज कंपन्यांचे फोन खरेदी करण्यासाठी सरसावतात. आता तर ऑनलाईन फोन मिळू लागले आहेत. त्यावर भरघोस ऑफर्सही. त्यामुळेच या फोन्सची सध्या चलती आहे. त्याचा परिणाम या देशी बनावटीच्या फोन्सवर होत आहे.

- Advertisement -
मोबाईल नेटवर्क पोर्ट करा फक्त ‘दोन’ दिवसात

पगार रखडला

लावा कंपन्यांचे नुकसान पाहता त्याचा परिणाम पगारावरही झाला आहे. नोव्हेंबर महिन्याचे पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. याची माहिती देणारा एक मेलही कंपनीतील कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. आधी ६० आणि मग४० टक्के पगार देण्यात येणार आहे.

फोन्सची मागणी वाढली

मोबाईल कंपन्यांचा विचार करता झिओमी, सॅमसंग, विवो, मायक्रोमॅक्स आणि ओपो या फोनची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांचा खपही जास्त आहे. या फोनमुळेच अन्य कंपन्यांचा विक्रीवर परिणाम झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -