घरदेश-विदेशधक्कादायक: बिहारच्या या शाळेने राबवली आधुनिक जातीव्यवस्था

धक्कादायक: बिहारच्या या शाळेने राबवली आधुनिक जातीव्यवस्था

Subscribe

भारताने संविधानाचा स्वीकार केल्यानंतर जातीय व्यवस्था गाडून समतेवर आधारीत व्यवस्थेचा स्विकार केला असला तरी अजूनही भारतात जातीवर आधारीत व्यवस्था पुन्हा पुन्हा निर्माण केली जाते. खरंतर शिक्षण आपल्याला चांगला नागरिक बनवण्यासाठी मदत करते. मात्र शिक्षण देणाऱ्या शाळेतच जातीय तेढ निर्माण केली जात असेल तर… होय, बिहार मधील एका शाळेतले हे धक्कादायक वास्तव्य आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील एक उच्च माध्यमिक शाळा मागच्या चार वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीनुसार वर्ग पाडून त्यांना वेगवेगळे बसवत आहे.

सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या या शाळेने बिनबोभाटपणे मागच्या चार वर्षांपासून हा जातीभेदाचा खेळ चालवला आहे. मात्र आता ही घटना उजेडात आल्यानंतर बिहारच्या शिक्षण विभागाने याची मंगळवारी चौकशी लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील विद्यार्थी एकत्र शाळेत येत – जात असले तरी शाळेत त्यांना जातीनुसारच बसावे लागते. एवढेच नाही तर त्यांना एकमेकांच्या वर्गात जायला देखील बंदी घालण्यात आलेली आहे.

- Advertisement -

या शाळेने फक्त जातीनुसार नाही तर धर्मानुसार देखील विभागणी केलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मातील मुलांसाठी वेगळे वर्ग आणि इतर शालेय उपक्रमांसाठीही वेगवेगळी जागा निश्चित केलेली आहे. तसेच हिंदू धर्मातील विद्यार्थ्यांचेही ओबीसी आणि दलित असे गट पाडून वेगवेगळे वर्ग भरविण्यात येतात. यासोबतच हजेरीपटही जातीनिहायच बनवलेला आहे.

हे वाचा – आरक्षणाचा तिढा; सरकारला वेढा

“या शाळेत जाऊन पाहणी केली असता अशाप्रकारची आधुनिक जातीयव्यवस्था इथे अस्तित्वात असल्याचे आढळून आले. आम्ही राज्याच्या शिक्षण विभागाला सविस्तर अहवाल सादर करणार असून त्यावर कारवाई करण्यासाठीही सांगणार आहोत.”, अशी प्रतिक्रिया लालगंजच्या गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमार तिवारी यांनी दिली.

- Advertisement -

यावर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मात्र धक्कादायक असा खुलासा केला आहे. त्यांनी या जातीय वर्गीकरणाचे समर्थन केलेले आहे. “सामाजिक विभाजीकरणामुळे ज्ञानदानात सुलभता येते. तसेच सरकारच्या योजना राबविण्यासाठी आम्हाला त्या त्या समाजगटातल्या विद्यार्थ्यांना न्याय देता येतो. जात किंवा धर्मावर आधारीत कोणतीही विषमता आमच्या येथे नाही.”, असे उत्तर मुख्याध्यापिका मीना कुमारी यांनी दिले आहे.

हे वाचा – कुपोषणातही होतेय जातीचे पोषण 

बिहारचे शिक्षण मंत्री क्रिष्णानंदन प्रसाद वर्मा यांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर माझा विश्वास बसत नाही. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यात दोषी आढळणऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -