घरदेश-विदेशकाँग्रेसला अहंकार नडला

काँग्रेसला अहंकार नडला

Subscribe

पंतप्रधान मोदींनी केली काँग्रेसवर कसून टीका, स्वतःवरच विश्वास नाही ते आमच्यावर काय विश्वास ठेवणार

लोकसभेतील पवसाळी अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेसला चांगलेच वेठीस धरले. ज्यांना स्वःतावर विश्वास नाही ते आमच्यावर काय विश्वास करतील? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. लोकसभेतील दिवसभराच्या घटनांवरुन त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाना साधला. मागील चार वर्षांमधील कामांचा आढावाही त्यांनी यावेळी सादर केला. मोदींच्या भाषणादरम्यान विरोधांकानी गोंधळ करुन भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. सकाळच्या भाषणानंतर राहुल गांधींनी मारलेल्या डोळ्यांवरही मोदींनी टीका केली. काँग्रेसला असलेल्या अहकांरामुळे ते देशाच्या नागरिकांना आपल्या समोर काहीच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले.

काय होते मोदींचे भाषण


काँग्रेस पक्षाला अहंकार आहे. पंतप्रधान पंधरा मिनिट उभे राहू शकत नाही असे त्यांना वाटते. मी उभा पण आहे आणि कामावर अडून देखील आहे. लोकतंत्रात जनताच राजकीय पक्षांचे भाग्य ठरवते. २०१९ मध्ये जर काँग्रेस जिंकली तर पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी एकचजण असेल. मात्र इतरांचे काय होईल ही भिती पक्षातील सर्वांना आहे. पक्षात एकच उमेद्वार असल्यामुळे इतरा कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. एक मोदीला हटवण्यासाठी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसला एक सल्ला देऊ ईच्छीतो मला हटवण्यासाठी अविश्वास प्रस्तावचे कारण देऊ नका. जेवढा अविश्वास तुम्ही सरकार करतात तितकाच विश्वास तुमच्या पार्टी कार्यकर्त्यांवर करा. आपल्या स्वार्थासाठी देशाच्या जनतेनी दिलेल्या आर्शिवादावर अविश्वास करु नका. सबका साथ सबका विकास याच मंत्राला लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. गावागावात विज पोहचवली हे काम पूर्वीची सरकार करु शकत होती मात्र त्यांनी ते केले नाही. आमच्या सरकारने गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले. जनधन खाते उघडण्याचा निर्णय आम्ही घेतल्यानंतर देशातील अनेकांनी बँकेत खाती उघडली.

- Advertisement -

देशातील गावांमध्ये आठ करोड शौचालय बनवण्याचे काम आमच्या सरकारने केले. उज्वला योजनेमुळे स्वयंपाकघरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. स्वयंपाकघर धुरमुक्त झाल्याने अनेक महिलांना धुरामुळे होणारा त्रास आता होत नाही. लोकांचे जिवन सुरक्षित व्हावे यासाठी वीमाचे सुरक्षा कवचपण आम्ही सुरु केले. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आजारी लोकांना आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेतला. ८० हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च करुन मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली सिंचन प्रक्रियेला पुन्हा सुरु केली. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे नेले. फसल वीमा योजनेतून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांचे वीमे उतरवले.

एलईडी बल्पची किंमत करुन लोकांना विकण्यात आले. हे एलईडी लाईट स्ट्रीट लाईट्समध्येही लावण्यात आले आहेत. यामुळे वीज वाचून याचा फायदा देशालाच होणार आहे. देशातील ५ कोटी भारतीय नागरिक आमच्या काळामध्ये दारिद्र रेषेवर आले. सध्या तरुण मुल देश चालवतात आणि आम्ही डिजीटल इंडियाकडे वाटचाल सुरु केली आहे. ४१ हजार कोटींचा व्यवहार ऑनलाइनच्या माध्यमातून होतो आहे. पाच मिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नोटबंदीमुळे तुम्हाला ज्या जखमा झाल्या आहेत त्या अजून भरल्या गेल्या नाहीत. काळ्या पैशाचा व्यवहार करणाऱ्या अडीच लाख कंपन्यांना आम्ही बंद केल्या. जे स्वतःवर विश्वास करु शकत नाही ते आमच्यावर काय विश्वास करतील. तुम्हाला देव येवढी शक्ती देओ की पुढील पावसाळी अधिवेशनातही तुम्ही पुन्हा विरोधी पक्षात बसून अविश्वास प्रस्ताव आणू शकाल. ज्या गोष्टींबद्दल माहिती नाही त्याविषयावर बोलले असता ते व्यक्तीचे नुकसान नसून ते देशाचे नुकसान असते. सर्जिकल स्ट्राईकला खोटे बोलून काँग्रेसने देशाच्या सैन्याचा अपमान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -