घरफिचर्सपुरूषांची भावनिक कुतरओढ

पुरूषांची भावनिक कुतरओढ

Subscribe

पुरूषांच्या आत्महत्येचे टोकाचे पाऊल घेण्यामागची स्थिती, परिस्थिती वेगळी असून एक समान बाब आहे, ती म्हणजे पुरुष म्हणून होणारी त्यांची भावनिक कुतरओढ.कर्ता पुरुष, कुटुंबाचे रक्षण करणारा,रडायला आले तरीही न रडणारा, स्वतःच्या असह्य वेदना अंतर्मनाच्या खोल गर्तेत साठवून हसत खेळत आपली ‘कर्तव्यदक्ष’ भूमिका बजावत असतोच.पण मानसिक कोंडीत चौफेर अडकलेला,आत्मविश्वासाचे खच्चीकरण झालेला, हताश होऊन मृत्यूच्या सापळ्यात निमित्ताचा धनी होतोही.

18 जुलै 2017 रोजी आयएएस अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एका मुलाने मन्मथने आपल्या जीवनाचा शेवट अगदी अकल्पितरित्या करून घेतला. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला, जन्मजात ज्ञानाची सुबत्ता असलेल्या मुलाने आपल्या जीवनाचा हा असा अंत का बरे केला असावा? अंधेरी येथील मनप्रीत आणि त्याच्यासारख्या अनेकजणांनी ब्लू व्हेल या मोबाईल गेमच्या अधिन होऊन आत्महत्या केली.

पुढे आत्महत्येच्या संसर्गजन्य रोगाला प्रौढावस्थेतील उच्चप्रतिष्ठित यशाच्या शिखरावर पोहोचलेली व्यक्ती देखील बळी पडू लागली. महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत धाडसी अधिकारी हिमांशू रॉय यांनी स्वतःचे जीवन संपवले. अमृत फार्मास्टीकलचे संचालक शैलेश जोशी यांची आत्महत्या. भय्यू महाराज तणावाला सामोरे कसे जायचे हजारो जणांना सांगायचे. पण स्वतःच्या जीवनाच्या परीक्षेत नापास का झाले? भय्युजींकडे कुठल्याही समस्येवर समाधान होते. राजकीय पेचांवर मार्ग काढायचे. पण त्यांना स्वतःच्या घरातील पेचावर तोडगा काढता आला नाही. म्हणून स्वतःचाच करूण अंत त्यांनी करून घेतला. कुलाबा येथील कुटुंबातील तिघांची आत्महत्या तसेच सरकारी वसाहत वांद्रे येथील राजेश भिंगारे आणि कुटुंबीय विष घेऊन आत्महत्या तर दिल्लीतील अकरा जणांची आत्महत्या. हुश्य् !!!

- Advertisement -

या सगळयांचा सारासार विचार केला एकच निदर्शनास येते ती म्हणजे स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांचीच आत्महत्या अधिक आहे आणि कुटुंबातील स्त्रियांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारे पुरूषच आहेत. आपल्याला आठवतही असेल उल्हासनगर येथील रिंकू पाटील. लग्नाला नकार दिला म्हणून एकतर्फी प्रेम करणार्‍या मुलाने तिला जिवंत जाळले. दुसर्‍या दिवशी त्यानेही आत्महत्या केली. तिसर्‍या वर्षात आय.टी. त शिकणार्‍या जितेश शर्माला विषयांचा ताण असह्य झाला नाही म्हणून त्याने विष पिऊन आत्महत्या केली. दिलीप शिर्के या सहाय्यक इन्स्पेक्टरने वरीष्ठ विलास जोशी यांनी रजेचा अर्ज नाकारला म्हणून त्यांना व स्वतःला गोळी मारली. अजून शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण शेतकरी स्त्रीने केलेली आत्महत्या अपवादच असेल. अजून पुरूष आत्महत्या किती आणि कुठे?

या वरील घटनांचा ऊहापाह करताना एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे पुरूषांच्या आत्महत्येचे टोकाचे पाऊल घेण्यामागची स्थिती, परिस्थिती वेगळी असून एक समान बाब आहे, ती म्हणजे पुरुष म्हणून होणारी त्यांची भावनिक कुतरओढ.कर्ता पुरुष, कुटुंबाचे रक्षण करणारा,रडायला आले तरीही न रडणारा, स्वतःच्या असह्य वेदना अंतर्मनाच्या खोल गर्तेत साठवून हसत खेळत आपली ‘कर्तव्यदक्ष’ भूमिका बजावत असतोच.पण मानसिक कोंडीत चौफेर अडकलेला,आत्मविश्वासाचे खच्चीकरण झालेला,हताश होऊन मृत्यूच्या सापळ्यात निमित्ताचा धनी होतोही. पण त्यांच्या या मानसिक कोंडीचे, भावनिक कुतरओढ होण्याचे मूळ कारण नक्की दडलेय कुठे? आपल्याला हव्या त्या गोष्टी पालकांकडून सहज मिळणे ही झालेली त्यांची सवय, नकाराचा नसलेला अनुभव किंवा नकार पचवण्याची सहनशक्ती नाही, तर कधी नकाराला सामोरे कसे जायचे हे माहीत नाही. भावनिक बुद्ध्यांक (Emotional Quotien) विकसित झालाच नाही.

- Advertisement -

साहस, धैर्य स्वीकारण्याची वृत्तीच नाही. (Adversity Quotien) साहस बुद्ध्यांक ही विकसित झाला नाही. दु:ख पेलवण्याची क्षमता कमी असणे. ‘अहंकार दुखावला जाणे’ हे ही एक कारण त्यामागील कारण आहे.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश संपादन करण्याची वृत्ती. पण त्यातून येणारा आणि न झेपणारा ताण. कुटुंबात आर्थिक सुबत्ता आणणे तसेच कामगिरी पूर्ण करताना अजून एक दडपण असते ते म्हणजे ‘लैंगिक सामर्थ्य’. कधी कधी लैंगिकतेविषयी अर्धवट ज्ञान, गैरसमजुतीमुळे न्यूनगंड येणे. सोशल मीडिया (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम) आणि वास्तविक दुनिया यात नियंत्रण ठेवताना होणारी कसरत या सर्वांमधून नैराश्यता, वैफल्यता मग ‘हायपरटेन्शन’ यासारखे शब्द त्यांना मानसिक विकृतीकडे नेतात. आपले मन कोणापुढे ‘रिक्त’ही करू शकत नाही. कारण ही सर्व बायकीपणाची लक्षणे. मग ‘दमन’ झालेल्या इच्छा-आकांक्षा यांचा एकदाच विस्फोट होतो.

एक तर दुसर्‍यांना संपवणे किंवा स्वत:च स्वत:ला संपवणे ही आक्रमकता बाहेर येते. हे वागणे भेकडपणाचेच. निर्भीडपणाचे नाहीच मुळी. निर्भीडपणा आहे स्त्रियांमध्ये तो त्यांनी दाखवून दिलाच आहे. स्त्रियांनी पुरुषांना मागे ठेवून सर्वच क्षेत्रात यशाची कामगिरी केली आहे.पुरुष आत्महत्या करतो; पण त्यानंतर कुटुंबातील स्त्रीच धडाडीने पुढे येते. भय्यू महाराज गेले. पण त्यांची वयस्कर आई, त्यांची मुलगी व त्यांची बायको. धडपडत जगत आहेत. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याची पत्नी पूर्ण कुटुंबाला आधार देते. स्त्रीच्या लढाऊ वृत्तीला, सोशिकतेला सलाम ठोकावा तेवढा कमीच. अगदी सीतेपासून राणी लक्ष्मीबाई, जिजाऊमाता आणि आतापर्यंत सर्व घराघरातील लेकी यांना मानाचा मुजरा. संघर्ष सर्वांनाच करावा लागतो. फक्त आपल्या आयुष्यातील संघर्षाचा अर्थ आपण कसा लावतो. यावर सगळे अवलंबून असते. पितृसत्ताक प्रधान संस्कृती, पुरुषत्व या संकल्पनांना भेदून स्वत:पासूनच पुरुषांनी सुरुवात करावी यासाठी मला कवी सुरेश भट यांच्या चार सुंदर

ओळीची आठवण झाली.
आयुष्य छान आहे. थोडे लहान आहे!
रडतोस काय वेड्या ? लढण्यात शान आहे!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे!
उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे!
जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे….
आपल्या मनात एक विश्व सामावलेले असते ते म्हणजे षड्र्िपूंचे, नऊ रसांचे. यावर विजय मिळवू शकतो त्याला ‘परमानंद’ गवसतो. पण या वृत्ती, षड्र्िपूंवर विजय मिळविण्यासाठी मनाची बैठक लागतेच.
क्रमश.


-मयुरा म्हात्रे-अनगत

(लेखिका समुपदेशक आहेेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -