घरमुंबईतृतीयपंथी विद्यार्थिनीने केला बलात्काराचा आरोप

तृतीयपंथी विद्यार्थिनीने केला बलात्काराचा आरोप

Subscribe

बारावीत शिकत असलेल्या एका तृतीयपंथीने एका ३५ वर्षीय इसमाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मालाड परिसरातील बांगूर नगर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पीडित तृतियपंथ्यानी पोलिंसाच्या हलगर्जीपणाने आरोपी फरार झाल्याचे सांगितले आहे.

कसा घडला प्रकार
गोरेगाव येथील सुभाष नगर येथे रहाणाऱ्या आपल्या मावशीच्या भेटीसाठी खुशबू (बदललेले नाव) जून महिन्यात आली होती. त्यावेळी घरा बाहेर उभी असताना या इसमाशी तिची ओळख झाली. हा इसम तिच्या मावशीला ओळखत होता. खुशबूशी ओळख झाल्यानंतर त्याने खुशबूला २० जून रोजी घरी चहा पिण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याच्या घरात कोणीही नव्हते. घरात बोलावून त्याने खुशबूसोबत शरीर संबध बनवले. तिने याचा विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने एक दिवस खुशबूला आपल्या घरीच थांबवून ठेवले. तिने त्याच्या घरातून पळून ही गोष्ट मावशीला सांगितली. यानंतर मावशीबरोबर जाऊन खुशबूने बांगूर नगर पोलिसांकडे याची तक्रार केली होती. सुभाष शिंदे असे या इसमाचे नाव असून त्याला १३ वर्षीय मुलगा आणि पत्नी आहेत.

- Advertisement -

खुशबू ही पोरकी आहे. तिचे आई-वडिल ती लहान असतानाच मयत झाले. पालघर येथील एका इंग्रजी शाळेत शिकत असलेली खुशबूने नुकतीच १२ वी ची परिक्षा पास केली. मात्र तृतीयपंथी असल्यामुळे तिला शाळेतूनही काढण्यात आले. खुशबूला पुढे शिकण्याची इच्छा आहे मात्र शाळेतून काढण्यात आल्यानंतर तिचे शिक्षण येथेच थांबेल असे तिने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -