घरदेश-विदेशAcharya Pramod : काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांचा पक्षाला घरचा अहेर, खर्गेंच्या...

Acharya Pramod : काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांचा पक्षाला घरचा अहेर, खर्गेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (ता. 03 फेब्रुवारी) एका भाषणात कार्यकर्त्यांची तुलना ही कुत्र्यांशी केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. खर्गे यांनी नवी दिल्लीत न्याय संकल्प कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून निशाणा साधण्यात आला. मात्र, आता खर्गेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्याच नेत्याने टीका केली आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी खर्गे यांचा वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केला आहे. “कार्यकर्ता कर्मठ आणि कर्मवीर असतो, कुत्रा नाही” अशा शब्दांत आचार्यांनी खर्गेंवर टीका केली आहे. (Congress leader Acharya Pramod’s criticism of Mallikarjun Kharge’s statement)

हेही वाचा… PM Modi : पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची सडकून टीका

- Advertisement -

आचार्य प्रमोद कृष्णम हे काँग्रेसचे नेता असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते पक्षविरोधी वक्तव्ये करताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे. परंतु, आता त्यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरच निशाणा साधल्याने यामुळे आणखी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आचार्यांनी X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट खर्गेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, “कार्यकर्ता हा ‘कुत्रा’ नसतो, तो एक मेहनती आणि धाडसी माणूस असतो. आदरणीय अध्यक्ष, ही नक्कीच कटू गोष्ट आहे, पण हे खरे आहे.” असा टोला त्यांनी या पोस्टमधून लगावला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खर्गे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी नवी दिल्लीत न्याय संकल्प कार्यकर्ता परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, आमच्या इथे एक म्हण आहे. आपण बाजारात गेल्यावर कुत्रा किंवा कोणताही प्राणी विकत घ्यायचा असेल तर त्याची नीट तपासणी करतो. एखादा प्रामाणिक प्राणी (कुत्रा) घ्यायचा झाल्यास आपण त्याचे कान पकडून पाहतो. त्याला उचलल्यावर तो भुंकला तर ठीक आहे. पण त्याने थोडासा आवाज केला तर तो घेत नाही. त्यामुळेच निवड करताना भुंकणाऱ्या, भांडणाऱ्या आणि सोबत राहणाऱ्याला घ्या, त्यांना बूथ लेव्हल कमिटीचे अध्यक्ष करा, असे विधान खर्गेंनी केले.

ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुढे म्हटले की, अशा व्यक्तीला बूथवर बसवा जो सकाळी 7 वाजताच बूथवर हजर होईल आणि ज्यावेळी मतदान संपेल तेव्हा तो कार्यकर्ता सही करुनच तिथून बाहेर पडेल. पण केवळ जाऊन येणे योग्य नाही, असे स्पष्ट मत खर्गेंकडून व्यक्त करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -