घरदेश-विदेशLive Update: गोव्यातील १४ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, यापैकी २ घरी परतले, ३...

Live Update: गोव्यातील १४ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, यापैकी २ घरी परतले, ३ रोमानियामध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

Subscribe

गोव्यातील १४ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यापैकी २ विद्यार्थी आपल्या घरी पोहोचले आहेत. तर ३ विद्यार्थी बॉर्डर क्रॉस करून रोमानियामध्ये आल्याची माहिती, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

- Advertisement -

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार

- Advertisement -

मुख्यमंत्री अधिवेशनाला १०० टक्के हजर राहणार – अजित पवार


अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी ठाकरे सरकारची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अनिल परब उपस्थित असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीत आहे.


मुंबई गेल्या २४ तासांत १०० नवे कोरोनाबाधित आढळले असून एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच १६८ रुग्ण कोरोनामुक्त आज दिवसभरात झाले आहेत. सध्या राज्यात ६८९ सक्रीय रुग्ण आहेत.


जवळपास 17,000 भारतीय नागरिकांनी युक्रेनची सीमा केली पार, MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांची माहिती

 


राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक जनरल (निवृत्त) व्हीके सिंग यांनी पोलंडमधील रझेझोव येथील हॉटेल प्रीझीडेन्की येथे ६०० भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सहयाद्री अतिथीगृह येथे चहापान पार पडले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते. या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.


महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.


तिसरं महायुद्ध अणवस्त्राने लढलं जाईल, असा इशारा रशियाने दिला.


बिहार MLC निवडणूक ४ एप्रिल २०२२ रोजी होणार असून, ७ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.


संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण करावं लागतं हे मविआ सरकारचं अपयश – देवेंद्र फडणवीस

मविआ सरकार इतिहासातील सर्वात भष्ट्राचारी सरकार

अजित पवारांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही

दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु – देवेंद्र फडणवीस

नवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे- देवेंद्र फडणवीस

नवाब मलिकांचा राजीनाम्यासाठी भाजपा प्रयत्न करणार

ईडीच्या कोठडीत असणारे मलिक मंत्रिपदावर कसे?

अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवरून चर्चा झाली नाही तर आम्हाला विचार करावा लागेल


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांचे रोमानिया आणि हंगेरीसाठी हिंडन एअरबेसवरून रवाना


ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी टळली

ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या विकास गवळी यांच्याकडून आणखी एक याचिका दाखल

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आता उद्या सुनावणी होण्याची शक्यता


आर्यन खान प्रकरणात एनसीबीने बनाव केल्याचं उघड झालंय – संजय राऊत


देशात आज 7,554 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 223 रुग्णांचा मृत्यू


राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर आज सायंकाळी 5.30 वाजता होणार हा कार्यक्रम


कॉर्डेलिया क्रूझवरील कारवाईत आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही, एनसीबीच्या विशेष चौकशी समितीचा निष्कर्ष


युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरणार नाही – जो बायडेन

रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय

युक्रेनला 1 बिलियन अमेरिकन डॉलरचं अर्थसहाय्य जाहीर

आर्थिक निर्बंध लादून रशियाची कोंडी करणार- जो बायडेन


ओबीसी आरक्षणावर आज सुनावणी


नवाब मलिकांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी


सीबीआय आज पुन्हा अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवणार


राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज बैठक


भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक


रशिया आणि युक्रेनमध्ये आज दुसरी बैठक

भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोल्दोव्हाच्या सीमा खुल्या

रशिया कीवमध्ये मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

रशियाकडून युक्रेनच्या टीव्ही टॉवरवर हल्ला, 5 जणांचा मृत्यू

ऑपरेशन गंगाचं आठवं विमान भारतात दाखल

रोमानियातून विनाव्हिसा परतू शकणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -