घरदेश-विदेशडेन्मार्क देशाने थांबवला एस्ट्राजेनेका लसीचा वापर

डेन्मार्क देशाने थांबवला एस्ट्राजेनेका लसीचा वापर

Subscribe

एस्ट्राजेनेका लशीच्या वापरावर बंदी घालणारा डेन्मार्क पहिला देश ठरला आहे.

जगभरात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. यात ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकाने विकसित केलेल्या कोरोना लसीचा वापर अनेक देशांत सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एस्ट्राजेनेका लस दिल्यानंतर नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेक देशांनी एस्ट्राजेनेका लशीचा वापर तात्काळ थांबला आहे. मात्र डेन्मार्क देशाने लसीचा नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका असल्याचे सांगत लसीकरण मोहिमेतून एस्ट्राजेनेकाला लसीकरण मोहिमेतून वगळले आहे. त्यामुळे एस्ट्राजेनेका लशीच्या वापरावर बंदी घालणारा डेन्मार्क पहिला देश ठरला आहे.

दरम्यान युरोपातील काही देशांनी एस्ट्राजेनेका लसीचा वापरावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. या डेन्मार्क देशाने लसीकर मोहिमेतून आता एस्ट्राजेनेका लसीचा वापर कायमचा थांबवण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. एस्ट्राजेनेका लस सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले होते. मात्र तरीही डेन्मार्क देशाने हा निर्णय जाहीर केला. भारतात एस्ट्राजेनेका लसीचे उत्पादन सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून घेतले जाते.

- Advertisement -

फिनलँड, युरोपीयन युनियनच्या काही देशांनीही एस्ट्राजेनेका लसीचा वापरावर बंधने आणली आहेत. यात डेन्ंमार्कसह, जर्मनी आदी देशांचा समावेश आहे. दरम्यान दक्षिण अफ्रिकेनेही खबरदारीचा उपाय म्हणून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचा वापर रोखला आहे, या लसीमुळे देखील रक्ताच्या गाठी होण्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या अनेकांमध्ये लसीकरण मोहिमेवर परिणाम होत आहे. जॉन्सन च्या लसीचा पुरवठा रोखल्यामुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे युरोपीयन देशांमध्ये लसींचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -