घरदेश-विदेशDelhi Weekend Curfew: जाणून घ्या, काय राहणार सुरू आणि कशाला असणार बंदी

Delhi Weekend Curfew: जाणून घ्या, काय राहणार सुरू आणि कशाला असणार बंदी

Subscribe

दिल्लीत कोरोना व्हायरसचा वाढता कहर बघता केजरीवाल सरकारने गुरुवारी राजधानी दिल्लीत शनिवार आणि रविवार कर्फ्यूची घोषणा केली. दिल्लीत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज यासंदर्भातील घोषणा केली आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता कोरोना बाधितांच्या आकड्यांवर नियंत्रण मिळण्यासाठी दिल्ली सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

आज केजरीवाल यांची उप राज्यपालांशी बैठक पार पडली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी आवश्यक सेवा वगळता उर्वरित कामांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला मास्क आणि सोशल डिस्‍टेन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जाणून घ्या, दिल्लीत शनिवार आणि रविवारच्या कर्फ्यूदरम्यान काय खुले आणि काय बंद राहणार आहे. दिल्लीत ३० एप्रिलपर्यंत शनिवारी आणि रविवारी विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली असून कर्फ्यूदरम्यान दिल्लीतील सर्व आवश्यक सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.

- Advertisement -

  • मॉल, जीम, स्पा आणि ऑडिटोरिअम राहणार बंद.
  • साप्ताहिक बाजार प्रत्येक भागात एकच असेल. बाजारपेठेत जास्त गर्दी होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था.
  • चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षकांच्या क्षमतेसह चालू ठेवण्यास परवानगी.
  • हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण्यास बंदी, होम डिलिव्हरीला परवानगी.
  • अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी. यासाठी कर्फ्यू पास जवळ असणं आवश्यक.
  • लग्न, अंत्यसंस्कार यासारख्या विधीसाठी लोकांची मर्यादा कायम. यासाठी कर्फ्यू पास असणं आवश्यक.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या घटनेने दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण पडला आहे. परिस्थितीनुसार, १४ मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये केवळ कोविडसाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर १५ हॉटेल्सचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -