घरमनोरंजन'एक व्हिलन २'च्या चित्रीकरणाला सुरुवात, मोहितसोबत पुन्हा काम करण्यास अर्जून कपूरची उत्सुकता

‘एक व्हिलन २’च्या चित्रीकरणाला सुरुवात, मोहितसोबत पुन्हा काम करण्यास अर्जून कपूरची उत्सुकता

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आता 'एक व्हिलन २' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन ‘या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची दमदार कॅमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर आता ‘एक व्हिलन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. गोव्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. मोहित सुरी या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत पुन्हा एकदा गोव्यासारख्या निसर्गरम्या ठिकाणी जाण्यासाठी अर्जून उत्सुक आहे. अर्जूनसोबत या चित्रपटात जॉन अब्राहम , तारा सुतारिया, दिशा पाटनी यांच्याही भूमिका असणार आहेत. याबाबत एक पोस्ट अर्जून ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अर्जून म्हणाला, “मोहितसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी केव्हापासूनच वाट बघत होतो. हाफ गर्लफ्रेंडच्या चित्रीकरणाच्या वेळचा माझा अनुभव एक कालाकार म्हणून समृध्द करणारा होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

 चित्रीकरणादरम्यान मला फारच मजा आली होती. माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट संगीत त्याच्यामुळे मला मिळाले आणि मी माझ्या मित्रमंडळींना आणि जवळच्या लोकांना नेहमीच सांगत असतो की आदित्य चोप्राशिवाय जर कोणी खरोखरच माझ्यावर विश्वास ठेवत असेल तर तो मोहित आहे. माझ्यावरील विश्वासामुळेच तो पुन्हा एकदा माझ्यासोबत काम करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

- Advertisement -

 तो पुढे म्हणाला, “ही एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यासोबत काम करण्यासाठी एव्हरेडी असतो. कारण त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते. मला पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात करायची आहे आणि इतक्या मोठ्या चित्रपटासाठी मोहितसोबत काम करण्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. चित्रपटाचा सिक्वेल करणे, फ्रेंचाईज करणे आणि अनेक कलाकारांसोबत काम करणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. जॉन, मी, तारा, दिशा आणि अर्थातच दणदणीत संगीत यांना एक दिग्दर्शक या नात्याने त्याने एकत्र आणले आहे.”अर्जून त्याच्या दिग्दर्शकाचा मोठा चाहता आहे. मोहित त्याच्या संगीताने जी जादू करणार आहे त्यासाठी मी कमालीचा उत्साही असल्याचेही अर्जून म्हणाला आहे.


हे वाचा-सुपरहिट दक्षिणात्य चित्रपट ‘अन्नियन’च्या हिंदी रिमेक मध्ये झळकणार रणवीर सिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -