घरCORONA UPDATEसावध व्हा! कोरोनाचा ८० टक्के रुग्णांच्या मेंदूवरही गंभीर परिणाम, स्मृतीभ्रंश आणि मेंदूचे...

सावध व्हा! कोरोनाचा ८० टक्के रुग्णांच्या मेंदूवरही गंभीर परिणाम, स्मृतीभ्रंश आणि मेंदूचे आजार वाढले

Subscribe

मेंदूवर कोरोनाचा प्रत्यक्ष परिणाम नाही

कोरोनाचा फुफ्फुस आणि ह्रदयावर गंभीर परिणाम होतात आपण ऐकूण आहोत. मात्र एका नव्या अभ्यासात मेंदूवरही कोरोनाचा गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लागण झाल्यावर किंवा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता मेंदू विकारासंबंधीत लक्षणे वाढत आहे. नेचर या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कोरोनाचा मेंदूवर गंभीर परिणाम होत असून यात स्मृती भ्रंश, यांसारखे मेंदूसंबंधीत आजारात वाढत आहेत. तसेच मेंदूत रक्त प्रवाह करण्यास अडथळा येत आहे.

या अहवालात येल युनिव्हर्सिटीच्या न्यूरो साइंटिस्ट सेरीन स्प्युडिचचा हवाला देण्यात आला आहे. ज्यामध्ये गंभीर कोरोना संसर्गातून बरे झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये मेंदूच्या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. यामध्ये स्मृती कमी होणे आणि मेंदूसंबंधीत आजाराची सौम्य लक्षणे आढळली आहेत. तर बर्‍याच जणांमध्ये मेंदूला रक्त पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे मृत्यूचा धोका वाढतोय. तसेच रुग्णांच्या मेंदूच्या तपासणी अहवालात सेरेब्रल कारटेक्समधून ग्रे रंगाचा घटक कमी होत आहे.

- Advertisement -

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोरोना विषाणू मेंदूमधील एस्ट्रोसाइटस पेशींनाही नुकसान करीत आहे. या पेशी मेंदुतील बरीचं कार्य सुरुळीत ठेवण्यास मदत करतात, यामुळे मेंदूचे काम सहजतेने चालू राहते. या अहवालात ब्राझीलच्या अभ्यासाचा संदर्भ घेण्यात आला आहे. ज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २६ लोकांच्या मेंदूची तपासणी केली गेली. यापैकी ५ जणांच्या मेंदूत कोरोनाचा संसर्ग आढळला. तर ६६ टक्के लोकांच्या मेंदूतील एस्ट्रोसाइट्स पेशींना कोरोनाचे संक्रमण झाले होते.

स्मृती भ्रंश होणे म्हणजे?

अहवालात असे म्हटले गेले आहे की, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या बहुतेक लोकांमध्ये स्मृती भ्रंशाची समस्या दिसून आली आहे. यामुळे लोकांना कोणताही गोष्ट अधिक काळ लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. तर इतर रुग्णांमध्ये थकवा आणि नैराश्य यांसारथी लक्षणे दिसून आले आहेत.

- Advertisement -

सौम्य लक्षणांमागे कोणते कारण? 

लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमणामुळे मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा होत नसल्यामुळे पेरीसाइट्स पेशींचे कार्य बिघडते. परंतु कालांतराने नॉर्मल वाटते. यामुळे सौम्य झटकाही येऊ शकतो.

मेंदूवर कोरोनाचा प्रत्यक्ष परिणाम नाही

सुरुवातीच्या अनेक अभ्यासात असा दावा करण्यात आली की, कोरोना विषाणू थेट मेंदूत प्रवेश करू शकतो. आणि मेंदूवर गंभीर परिणाम करतो. परंतु नवीन संशोधन असे सूचित करते की, मेंदूतील संरक्षण यंत्रणेमुळे कोरोना थेट मेंदूवर परिणाम करु शकत नाही. परंतु मेंदूच्या कार्याचा कोरोनाचे अप्रत्यक्ष परिणाम जाणवतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -