घरदेश-विदेशCoronavirus: India - UK मधील कोरोना वेरिएंटमध्ये आढळले साम्य, महाराष्ट्रासह अनेक राज्यात...

Coronavirus: India – UK मधील कोरोना वेरिएंटमध्ये आढळले साम्य, महाराष्ट्रासह अनेक राज्यात धोका कायम

Subscribe

कोरोना व्हायरस पहिलं डबल वैरिएंट B.1.617 हे दक्षिण भारतातील काही विभागात आढळले होते. काही संशोधन कर्त्यांची टिम याचा तपास करत आहेत.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचे सावट अत्यंत गडद होत चालेले आहे. कोरोना व्हायरस मुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेगाने भारतात पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला आहे. तसेच हजारो लोकांच्या मृत्युची नोंद केली जात आहे. कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमध्ये नव्याने आलेला वैरिएंट हा खूप जास्त घातक असल्याचे तज्ञान कडून संगितले जात आहे. एका अभ्यासानुसार समोर आले आहे की कोरोना व्हायरसचा नवीन वैरिएंट भारत देशात आणि याचप्रमाणे यूके (UK) मध्ये एक सारख्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसतेय.

ब्रिटेन मधील हेल्थ डिपार्टमेंट मधील कार्यकारी एजन्सि रिपब्लिक हेल्थ तर्फे सांगण्यात येत आहे की, भारत मधील कोरोना व्हायरसच्या डबल वैरिएंट B.1.617.2 हा युके मधील डबल वैरिएंट B.1.1.7 सारख्या प्रमाणात आहे. B.1.617.2 म्यूटेंट ब्रिटेन

- Advertisement -

व्यतिरिक्त भारत मधील महाराष्ट्रसाहित अनेक जागी आढळला असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये सध्या तरी याचा तपास पुर्णपणे होऊ शकला नाही. कोरोना व्हायरस पहिलं डबल वैरिएंट B.1.617 हे दक्षिण भारतातील काही विभागात आढळले होते. काही संशोधनकर्त्यांची टिम याचा तपास करत आहेत.काही दिवसांपूर्वी कॅनडा मधील तज्ञानी कोरोना वैरिएंट B.1.1.7 चा पहिला मॉलिक्यूलरफोटो प्रसारित केला होता. आणि याच स्ट्रोनमुळे कोरोना व्हायरसची दुसरी लाट अनेक देशमध्ये झपाटयाने पसरत आहे.


हे हि वाचा – महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे २०० रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -