घरताज्या घडामोडीCorona Vaccine: अंबानी करणार कोरोना लसीची निर्मिती, क्लिनिकल ट्रायलला मिळाली मंजूरी

Corona Vaccine: अंबानी करणार कोरोना लसीची निर्मिती, क्लिनिकल ट्रायलला मिळाली मंजूरी

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहाने आता कोरोना लसीची निर्मिती करण्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्सेसने कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोसची लस तयार केली आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेसने या लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी अर्ज केला होता. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मंजूरी दिली आहे.

गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी देण्याकरता विषय तज्ज्ञांची समिती (SEC)ची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये रिलायन्स लाईफ सायन्सच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी देण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -

एसईसीच्या बैठकीमध्ये रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या अर्जावर चर्चा करण्यात आली. ज्यानंतर मंजूरीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान लसीच्या क्लिनिकल ट्रायलचा पहिल्या टप्प्याचा हेतू लसीची सुरक्षा, सहनशीलता, फार्मा कोकाइनेटिक्स आणि औषध यंत्रणेची अचूक माहिती मिळवणे आहे.

देशात आतापर्यंत आपातकालीन वापरासाठी सहा लसींना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायटेकची कोव्हॅक्सीन, रशियाची स्पुटनिक व्ही आणि अमेरिकेची मॉडर्ना, जॉनसन अँड जॉनसन आणि झायडस कॅडिलाच्या लसीचा समावेश आहे. केंद्र सरकार सातत्याने देशातील लसीकरण मोहीम वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करित आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: वर्षभरानंतर कोरोना रुग्णांना थकवा आणि श्वास घेण्याच्या समस्या – संशोधन


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -