घरताज्या घडामोडीमाझ्या घरावर आलेल्या 'चिव'सैनिकांना पोलिसांनी चोप दिला, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

माझ्या घरावर आलेल्या ‘चिव’सैनिकांना पोलिसांनी चोप दिला, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

Subscribe

राज्यात पुढच्या वेळी जे येतील ते खासदार आमदार भाजपचे असतील याची आम्ही काळजी घेणार आहे.

माझ्या पाठी लागू नका नाहीतर मी सर्व पराक्रम जनतेसमोर आणेल असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. माझ्या घरावर आलेल्या चिवसैनिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्कार केला आहे. काय सत्कार केला पोलिसांनी सरदेसाईंना चांगला चोप दिला असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे यांनी कोकणातून शिवसेनेला आव्हान दिलं आहे. सत्तेतील लोकं आपली सत्तेची मस्ती दाखवत आहेत. सत्तेचा माज दाखवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत मात्र मी जर बोललो तर तुम्हाला परवडणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेनंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर घणाघात केला आहे. राणेंनी घरावर आलेल्या शिवसैनिकांचा यावेळी चांगलाच समाचार घेतला आहे. माझ्या घरासमोर आलेले चिव सैनिक त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्कार केला. काय सत्कार केला.. सरदेसाई साहेबांनी, चोप चोप चोपलं पोलिसांनी… असो थोडं थोडं काढूया एकाचवेळी अनेक ब्रेकिंग न्यूज नको असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

माझ्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कोणी काही म्हणाले तरी कोकणासाठी काम करणार आहे. मागील दोन वर्षात राज्य सरकारने कोकणाला काही दिलं नाही. जिल्हापरिषद कर्जबाजरी झाली आहे. पुराचे पैसे दिले? पुनर्वसन दिलं? रस्ते पाहिले? त्यांचा कारभार चालला आहे तो जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली…

जगाच्या पाठिवर घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली असं एकही उदाहरण जगात पाहिलं नाही. मंत्रालयात जायचं नाही. कॅबिनेटला हजर राहायाचे नाही. वर्षावर गप्पा मारायला जायचे, राणेंवर केस केली की राणे घाबरेल असं त्यांना वाटलं पण रक्तातच घाबरणं नाही त्यामुळे राणेला फरक पडत नाही असे नारायण राणे यांनी म्हटंल आहे.

- Advertisement -

पुढच्या वेळी आमदार, खासदार आमचेच 

राज्यात पुढच्या वेळी जे येतील ते खासदार आमदार भाजपचे असतील याची आम्ही काळजी घेणार आहे. रत्नागिरीत एवढे वर्ष आमदार झाले कधी विधानसभेत तोंड उघडलेले पाहिले नाहीत. पालकमंत्री रत्नागिरीत नाहीत. रत्नागिरीतले आमदार मंत्री होऊ शकत नाही. कोकणाला न्याय द्यायचा नाही. कोकणानेच शिवसेनेला न्याय दिला आहे. तेव्हा आताचे कोण मंडळी नव्हते असा हल्लाबोलही राणेंनी शिवसेनेवर केला आहे.

जन आशीर्वाद यात्र यशस्वी

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त जनतेचे प्रश्न समाजून घेतले आहेत. देशात ८० टक्के कारखाने, उद्योगधंदे माझ्याजळ आहेत. कोकणातील औद्योगिकीकरणासाठी मी काम करणार आहे. मी यानंतर कोकणात येईल तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येणार आहे. उद्योगाचं २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची माहितीही नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेनंतर दिली आहे.


हेही वाचा : आपल्याच वहिनीवरती अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? नाव न घेता राणेंचा खळबळजनक आरोप


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -