घरदेश-विदेशविराट कोहलीसाठी देश सर्वोतोपरी; खलिस्तानी गायक टीम इंडियाच्या ब्लॅकलिस्टमध्ये

विराट कोहलीसाठी देश सर्वोतोपरी; खलिस्तानी गायक टीम इंडियाच्या ब्लॅकलिस्टमध्ये

Subscribe

विराट कोहली रॅपर शुभला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. विराट कोहलीने शुभची प्रशंसा करत त्याला आपला आवडता गायक म्हटले होते. याबद्दल शुभने विराट कोहलीचे आभारही मानले होते, मात्र वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर कोहलीने शुभला अनफॉलो केले.

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंग उर्फ शुभला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. खलिस्तान समर्थक शुभने नुकतीच एक वादग्रस्त पोस्ट केली होती. यामध्ये भारताचा नकाशा खंडित दाखवण्यात आला होता. तेव्हापासून रॅपर शुभचा सर्वत्र विरोध होत आहे.(Country paramount for Virat Kohli Khalistani singer blacklisted by Team India)

विराट कोहली रॅपर शुभला इंस्टाग्रामवर फॉलो करत होता. विराट कोहलीने शुभची प्रशंसा करत त्याला आपला आवडता गायक म्हटले होते. याबद्दल शुभने विराट कोहलीचे आभारही मानले होते, मात्र वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर कोहलीने शुभला अनफॉलो केले.

- Advertisement -

शुभचा मुंबईतील शो रद्द

सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असलेला पंजाबी रॅपरवर अलीकडेच खलिस्तानी फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर शुभने इंस्टाग्रामवर एक वादग्रस्त पोस्ट टाकून वादाला खतपाणी घातले. यामुळे भारतीय जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. शुभचा मुंबईतील शो रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा : Ganpati Visarjan 2023 : दीड दिवसांच्या गणरायाला मनोभावे दिला निरोप

- Advertisement -

शुभचे जगभर चाहते

खलिस्तानी गायक शुभने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर केली होती. तेव्हा पंजाब पोलीस खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग नावाच्या फरार व्यक्तीचा शोध घेत होते. शुभ ओजी, एलिव्हेटेड आणि चीक्स सारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो. 2021 मध्ये, शुभने त्याचे पहिले गाणे वी रोलिन रिलीज केले, ज्याला यूट्यूबवर 206 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ते केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक ठिकाणी पसंत केला जातो.

हेही वाचा : भारतावरील आरोपानंतर सहकारी देशांनी सोडली कॅनडाची साथ; ‘आधी चौकशी, नंतर बातचीत’

यामुळे निर्माण झाला भारत आणि कॅनडामध्ये तणाव

18 जून 2023 रोजी हरदीप सिंह निज्जर याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील गुरु नानक शीख गुरुद्वाराजवळ दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. निज्जर हा या गुरुद्वाराचे संचालन करणाऱ्या समितीचा प्रमुख होता. हरदीपसिंग निज्जरने 2013-14 मध्ये पाकिस्तानलाही भेट दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -