घरCORONA UPDATEप्लाझ्मा डोनेशनसाठी कर्नाटक सरकारचा पुढाकार, दात्याला देणार ५००० रुपये!

प्लाझ्मा डोनेशनसाठी कर्नाटक सरकारचा पुढाकार, दात्याला देणार ५००० रुपये!

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy) रुग्णांमधले कोरोनाचे विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरेपीचा देशभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, यासाठी प्लाझ्मा डोनेट करणाऱ्यांची उणीव सध्या भासत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामधून प्लाझ्मा काढला जातो. मात्र, पुन्हा कोरोनाची (Corona) लागण होण्याच्या भितीपोटी बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेच करण्यासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कर्नाटक सरकारने ५ हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यातून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी अधिकाधिक दाते पुढे येतील, अशी अपेक्षा कर्नाटक सरकारला आहे.

कर्नाटक सरकारने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीच्या मदतीने उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मात्र, यासाठी कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेट (plasma donate) करण्यासाठी तयार करणं जिकिरीचं काम होऊन बसलं आहे. त्यासाठी या रुग्णांचं समुपदेशन करण्याची प्रक्रिया कर्नाटक सरकारने केली आहे. दोन दिवसांपूर्वी IMAनं देखील महाराष्ट्र सरकाराला कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लझ्मा डोनेट करणं आवश्यक करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा सामना करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झालेल्या असतात. त्यात प्लाझ्माच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या रुग्णांच्या शरीरात सोडून त्यातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं अनेक केसेसमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर २१ ते २८ दिवसांमध्ये त्याला प्लाझ्मा डोनेट करता येतो. १५ दिवसांतून एकदा प्लाझ्मा डोनेट करणं शक्य असतं. ४ महिन्यांपर्यंत एखादा रुग्ण प्लाझ्मा डोनेट करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -