घरदेश-विदेशधक्कादायक! कोरोना संसर्गाच्या ३९ दिवसांनंतर शरीरातील पेशींमध्ये आढळलं कोरोना व्हायरसचं अस्तित्व

धक्कादायक! कोरोना संसर्गाच्या ३९ दिवसांनंतर शरीरातील पेशींमध्ये आढळलं कोरोना व्हायरसचं अस्तित्व

Subscribe

कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर लोकं कोरोना चाचणी करतात. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला की, कोरोना नाही असेच आतापर्यंत समजले जात होते. मात्र नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती एका संशोधनातून समोर आली असून त्यात असे म्हटले की, कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरस पेशी म्हणजेच ऊतकांमध्ये आढळतात. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) भोपाळ येथे केलेल्या संशोधनात ही वस्तुस्थिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम्समध्ये कोरोनाच्या २१ रुग्णांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहेत. ज्यांच्या शरीरातील पेशीमध्ये हा व्हायरस आढळला आहे. या मृत शरीराला संसर्ग झाल्यानंतर ३९ दिवसांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यावरून असे समोर आले की, कोरोना संक्रमित झाल्यानंतर ३९ दिवसांनंतरही पेशींमध्ये त्या व्हायरसचे अस्तित्व असू शकते, असे एम्सचे संचालक प्रो. डॉ. सरमन सिंग यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात पहिल्यांदाच एम्स भोपाळमधील कोरोना रूग्णांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम संशोधनाच्या उद्देशाने करण्यात आले होते. संशोधनात असेही समोर आले आहे की, फुफ्फुसांशिवाय कोरोना व्हायरस मेंदू, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंडावर देखील हल्ला करतो. मुख्य संशोधक डॉ. जयंती यादव, अतिरिक्त प्राध्यापक, फॉरेन्सिक मेडिसिन विभाग म्हणाले की, उपचारादरम्यान, रूग्णाच्या पेशीमध्ये कोरोना व्हायरस आढळली होता, त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. संसर्ग झाल्यावर ३९ दिवसानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. संशोधनाच्या उद्देशाने, आरटीपीसीआर चाचणी रुग्णाच्या फुफ्फुस आणि इतर अवयवांमधून पेशी घेऊन करण्यात आली होती. यावेळी, फुफ्फुसांसह काही अवयवांमध्ये व्हायरस आढळला असल्याचे समोर आले.

या संशोधनात रूग्णाच्या मेंदूत ४७ टक्के व्हायरस सापडला आहे. यामुळे, मेंदूमध्ये सुमारे २४ टक्के लहान हेमरेज आढळून आला आहे. यातून रक्तस्त्राव देखील झाला होता. हिस्टोपाथोलॉजी तपासणीत रक्त जमा होण्याचे पुरावेही सापडले आहेत, परंतु यामुळे कोणालाही हृदयविकाराचा झटका आला नाही. सर्व रूग्णांना मूत्रपिंड निकामी होते, परंतु यामागचे कारण देखील एक दिर्घकाळ आजार असू शकतो.


नवं संकट! अमेरिकेप्रमाणे भारतातही आढळला डेल्टा प्लस सारखा AY.2 म्यूटेशन

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -