घरमहाराष्ट्रनाशिकरोटरी क्लबतर्फे कळवणमध्ये लवकरच 'एनआयसीयू'

रोटरी क्लबतर्फे कळवणमध्ये लवकरच ‘एनआयसीयू’

Subscribe

नवजात बालकांना होणार लाभ, कळवण रोटरी क्लब पदाधिकार्‍यांचे पदग्रहण

कोविड-१९ मुळे संपूर्ण जगात कठीण परिस्थिती निर्माण झालेली असताना कळवण रोटरीने उपजिल्हा रुग्णालयात सहा बेड्सचे अत्याधुनिक आयसीयू युनिट निर्माण केले आहे. यावर्षी रोटरीने आरोग्य सेवा व शेतकर्‍यांचा विकास या विषयावर सेवा देण्याचे ठरविले असून कळवणमध्ये रोटरी मार्फत लवकरच नवजात शिशूंसाठी आयसीयू सेंटर व आर्थोपेडीक लायब्ररी तयार करण्याचा मानस रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब ऑफ कळवणच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी मेहेर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी डी. ई. जाधव, सहप्रांतपाल संजय आनेराव, ओंकार महाले, नरेश मेहता, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. डॉ. अनंत पवार यांनी कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, याबाबतीत मार्गदर्शन केले. रोटरी क्लबच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे निलेश भामरे यांनी तर नूतन सचिवपदाची सूत्रे संभाजी पवार यांनी स्वीकारली. रोटरॅक्ट क्लबच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे कुमारी केतकी पगार व नूतन सचिवपदाची सूत्रे कुणाल देसले यांनी स्वीकारले. माजी उपप्रांतपाल विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisement -

माजी अध्यक्ष राजेश मुसळे यांनी अहवाल वाचन केले. रोटरी क्लब कळवणद्वारे विविध प्रकारे शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प अध्यक्ष निलेश भामरे यांनी केला. कार्यक्रमात कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या डॉ. सुधीर पाटील, डॉ. अनंत पवार, डॉ. नूतन सावंत, डॉ. प्रल्हाद चव्हाण यांचा रोटरी क्लब ऑफ कळवणमार्फत प्रमाणपत्र देऊन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आर.के.एम हायस्कूल कळवण, जानकाई हायस्कूल कळवण, किड्स हायस्कूल भेंडी या शाळेचे इंटरॅक्ट क्लबची घोषणा करण्यात आली. यावेळी नवीन सदस्य सीमा मुसळे, रवींद्र बोरसे, सुधाकर खैरनार यांना पीन देण्यात आली.

कार्यक्रमास महारू निकम, अंबादास आहिरे, राजेश मुसळे, जितेंद्र कापडणे, गंगाधर गुंजाळ, मोहनशेठ संचेती, संजय बगे, एन. डी. भामरे, निंबा पगार, डॉ. आर. डी. भामरे, डॉ. एस. बी. सोनवणे, सुभाष जैन, बापू कुमावत, प्रा. व्ही. डी. सोनवणे, प्रा. रवींद्र पगार, गंगा पगार, प्रमोद सूर्यवंशी, बी.एन. पगार, डॉ. तुषार पगार, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, प्रविण संचेती, गालिब मिर्झा, अविनाश पगार, भास्कर भामरे, एच. आर. गवळी, प्राचार्य बच्छाव, ईनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नयना पगार, सेक्रेटरी निर्मला संचेती, स्नेहा मालपुरे, जयश्रीताई शिरोरे, स्मिता खैरनार, अनिता जैन, शैला खैरनार, मंजुषा देवघरे, मीनाक्षी मालपुरे, रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सोनवणे व आभार प्रदर्शन संभाजी पवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -