घरमहाराष्ट्रनाशिकचाचणीच्या नावाखाली हजारो क्सुसेक पाण्याची नासाडी

चाचणीच्या नावाखाली हजारो क्सुसेक पाण्याची नासाडी

Subscribe

नांदूरमधमेश्वर धरणातून विसर्ग, पाणी सोडणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

निफाड : तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यातच भर म्हणून सोमवार (दि. 5) रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी टेस्टिंगच्या नावाखाली नांदूर मधमेश्वर धरणाचे तीन गेटमधून हजारो क्युसेक पाणी वाया घालवले. त्यामुळे विनाकारण पाणी सोडणार्‍या अधिकार्‍याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.

गोदावरी नदीवर असणार्‍या नांदूर मधमेश्वर धरणातून गोदाकाठच्या तुम्हारी तिसगाव 30 तसेच निफाड विंचूर लासलगाव 16 गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. धरणात असलेल्या पाणीसाठा मर्यादित स्वरूपाचा असताना व पाऊस झालेला नसताना अधिकार्‍यांनी टेस्टिंगच्या नावाखाली हजारो क्युसेक पाणी सोडल्याने भविष्यात भीषण पाणी टंचाई होऊ शकते. जिल्हाधिकार्‍यांची पूर्व परवानगी न घेता पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी मनमानी कारभार केला आहे. त्यामुळे त्यास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बोडके दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -