घरट्रेंडिंगगुजरातमध्ये 'कोरोना'बरोबर सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी!

गुजरातमध्ये ‘कोरोना’बरोबर सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी!

Subscribe

गुजरात येथे असणाऱ्या बनासकांठा या भागात २०१५ सालीच कोरोना दाखल झाला होता.

संपूर्ण जग जीवघेण्या कोरोनाचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसच्या नावाखाली लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल हे नक्की… गुजरातमध्ये ‘कोरोना’बरोबर सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी होताना दिसतेय.. गुजरात येथे असणाऱ्या बनासकांठा या भागात २०१५ सालीच कोरोना अस्तित्वात होता. जास्त विचार करू नका! कारण हा कोणताही जीवघेणा व्हायरस नाही तर गुजरातमध्ये असणाऱ्या हॉटेलचे नाव आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये बनासकांठा या ठिकाणी एक हॉटेल आहे. त्या हॉटेलचे नाव कोरोना असे असल्याचे समोर येत आहे. बनासकांठामधील राजस्थान सीमेवरील असलेल्या अमीरगडमधील कोरोना नावाच्या हॉटेलला पाहून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. गुजरातमधील बनासकांठाच्या सीमेवर असणाऱ्या या कोरोनाची सुरुवात २०१५ मध्येच झाली होती.

दरम्यान सध्या लॉकडाऊनमुळे हे हॉटेल बंद आहे. पण कोरोना नावामुळे लोकं आता हॉटेलसमोर उभे राहून त्यांचे फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी चांगलीच गर्दी करताना दिसताय. लोकांमध्ये हे कोरोना आकर्षणाचा विषय ठरले आहे. त्यामुळे कोरोना हॉटेल हे आता सेल्फी पॉईंट बनले आहे. कोरोना हॉटेल सुरू करणारे मालक बरकतभाई हे उत्तर गुजरातमधील सिद्धपूरचे रहिवासी आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हे हॉटेल २०१५ मध्ये सुरू करताना नाव काय ठेवावे, याचा विचार सुरू होता. त्यावेळी मालकाला उर्दूतील कोरोना हा शब्द आठवला. उर्दूमध्ये कोरोना म्हणजे स्टार गॅलेक्सी, असे बरकतभाईंनी सांगितले. तसेच, ज्यावेळी लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोक जोधपूर, पाली, राजस्थानला जाण्यासाठी या प्रमुख महामार्गावरुन जातात, तेव्हा कोरोना हॉटेलला पाहून लोकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो.


चीनमध्ये मुलाने आईला जिवंतपणीच पुरलं, तीन दिवसानंतर घडलं असं…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -