Lockdown – रशियन गर्लफ्रेंडशी करायचं होतं फिल्मी स्टाईल लग्न, पण पोलीस ठरले व्हीलन!

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच सेवा बंद आहेत. प्रत्येक राज्याच्या, जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र देशभरात लॉकडाउन असताना हिमाचल प्रदेशच्या शिमला जिल्ह्यात रशियन महिलेने प्रेवश करण्याचा प्रयत्न केला. रशियाच्या महिलेला आणि तिच्या भारतीय प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रशियाच्या महिला आणि तीचा प्रियकर ट्रकमध्ये लपून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी शिमला जिल्ह्यात त्यांना पोलिसांनी पकडलं. याप्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी(दि.६) शिमला जिल्ह्यात प्रवेश करताना शोघी येथे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सध्या या सगळ्यांना सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

ताब्यात घेतलेला तरुण कुल्लू येथील निर्मंड गावाचा रहिवासी आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथून हे दोघे कर्फ्यू पास नसताना एका ट्रकच्या मागे लपून प्रवास करत होते. निर्मंड येथे पोहोचल्यावर लग्न करण्याची दोघांची योजना होती. त्या दोघांसोबत ट्रक चालक आणि क्लीनरलाही ताब्यात घेण्यात आलं असून विविध आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेला धाली येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये तर तीन पुरूषांना शोघी येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे”अशी माहिती शिमला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ओमापति जामवाल यांनी दिली.


हे ही वाचा – ‘डिनर’ ‘त्या’ कामासाठीचा कोडवर्ड, शर्लिनने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव!