घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासांत ४६३ नव्या रुग्णांची वाढ, ५ जणांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासांत ४६३ नव्या रुग्णांची वाढ, ५ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत मागील २४ तासांत ४६३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १० हजार ५९७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ३७८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात मुंबईतील ५९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या २ लाख ९२ हजार ८१६वर पोहोचली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २ हजार ७३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ३६ हजार २वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार २१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९ लाख ४८ हजार ६७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस बलदेव सिंह प्रधान सचिव मुख्य निवडणूक अधिकारी या पदावरून प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय मुंबई येथे नियुक्त केले गेले आहे. तर आयएएस वेणुगोपाल रेड्डी यांना प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय मुंबई पदावरून सीआयसीओएम, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे


भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे.


‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी जनाब बाळासाहेब ठाकरे होतात, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्व सोडले होते का? हिंदूत्त्व कुणाचीच मक्तेदारी नाही. कारण हिंदूत्त्व जगाव लागत’, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. तर शर्जिलवर अग्रलेख लिहिण्यास इतका वेळ का लागला. शर्जिलवर सामनात अग्रलेख लिहायला वेळ मिळत नाही का? तसेच पुण्यात घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषेदला परवानगी का दिली?, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे’.


शर्जिलला पळून जायला सरकारची मदत

‘हिंदूंना सडलेल्या व्यक्ती म्हणणाऱ्या शर्जिलला आधी पळून का जाऊ दिले. शर्जिला पळून जाण्यास महाराष्ट्र सरकारनेच मदत केली आहे, असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेनेची खाली डोकं वर पाय अशा प्रकारची अवस्था झाली आहे’, अशी घणाघाती टीका माजी शिक्षण मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.


प्रियांका गांधींच्या ताफ्यातील गाडीला अपघात


ईडी कारवाईविरोधात एकनाथ खडसेंची हायकोर्टात याचिका


संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे घेणार शेतकऱ्यांची भेट

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कालच शेतकऱ्यांची भेट घेतली. आता त्यांच्या पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे देखील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.


हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल

शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले ! अशा शब्दात आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. देवेंद्रजी शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच ईच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे का हा देवेंद्रजी आपला प्रश्न योग्यच आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा असा सवाल अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रस्त्यावरच शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय असा प्रश्न भाजपला विचारण्यात आला आहे.


शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांचीही प्रतिक्रिया

शेतकरी आंदोलनाबाबत लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ‘भारत एक महान देश असून आपण सगळेच भारतीय यामुळे गौरवान्वित आहोत. त्यामुळे एक भारतीय म्हणून मला विश्वास आहे की, कोणताही मुद्दा असो किंवा समस्या असो त्याचा एक देश म्हणून आपण नेहमीच सामना केला आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा असो लोकांचे हित लक्षात घेऊन शांततापूर्ण पद्धतीने तो मुद्दा सोडवण्यात आपण सक्षम आहोत, जय हिंद’, असं म्हणत त्यांनी ट्विटमध्ये #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅगही दिले आहेत.


राज्यपालांची ठाकरे सरकारवर टीका

‘आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला राज्य सरकार आणि क्रीडा मंत्री सुनिल केदार नोकरी देऊ शकत नसतील तर काहीतरी गडबड आहे’, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे.


काँग्रेस का म्हणते ‘एकला चलो रे’?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याचा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून धरला गेला. त्या अनुषंगाने नेतेही कामाला लागले आहेत. तसे पाहता राज्यात काँग्रेसची ताकद अजिबातच वाढलेली नाही. असे असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ सोडण्यासाठी काँग्रेस का आतुर झालाय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकतो. या ‘एकला चलो रे’च्या तत्वाला अनेक कंगोरे आहेत.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -