घरक्रीडाT10 League : क्रिस गेलची फटकेबाजी; सर्वात जलद अर्धशतकाशी बरोबरी   

T10 League : क्रिस गेलची फटकेबाजी; सर्वात जलद अर्धशतकाशी बरोबरी   

Subscribe

गेलच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. 

वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रिस गेल आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. खासकरून टी-२० आणि आता टी-१० लीगमध्ये गोलंदाजांवर हल्ला चढवत असतो. गेलने सध्या सुरु असलेल्या अबू धाबी टी-१० लीगमध्ये अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. अबू धाबी संघाकडून खेळणाऱ्या गेलने मराठा अरेबियन्स संघाविरुद्ध अवघ्या २२ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली. त्याच्या ८४ पैकी ७८ धावा या केवळ षटकार आणि चौकारांच्या मार्फत आल्या. तसेच त्याने आपले अर्धशतक केवळ १२ चेंडूत पूर्ण केले. त्यामुळे त्याने टी-१० लीग स्पर्धेत मोहम्मद शहजादच्या सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. गेलच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.

अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक

या सामन्यात अबू धाबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मराठा अरेबियन्सने १० षटकांत ४ बाद ९७ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून अलिशान शराफूने २३ चेंडूत ३३ धावांची, तर मोहम्मद हाफिजने १३ चेंडूत २० धावांची खेळी केली. ९८ धावांचा पाठलाग करताना अबू धाबीचा सलामीवीर गेलने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला आणि अवघ्या १२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्या १० चेंडूत त्याने ३४ धावा करत अबू धाबीला विजय मिळवून दिला. अबू धाबीने ९८ धावांचे लक्ष्य अवघ्या ५.३ षटकांत गाठले.

- Advertisement -


हेही वाचा – सचिनच्या ट्विटनंतर केरळमधील चाहत्यांनी मागितली मारिया शारापोव्हाची माफी; ‘हे’ आहे कारण 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -