घरदेश-विदेश'गौमूत्र' आरोग्यासाठी हानिकारक; IVRI ने केला दावा

‘गौमूत्र’ आरोग्यासाठी हानिकारक; IVRI ने केला दावा

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय संस्कृती गोमूत्राला (cow urine) अत्यंत पवित्र मानले जाते. अनेकदा पूजेनंतर गोमूत्राचे सेवन करणे शुभ आणि फलदायी तसेच आरोग्यदायी मानले जाते. आजही बरेच लोक सकाळी गोमूत्र पितात, पण नुकत्याच केलेल्या संशोधन अहवालानुसार ताजे गोमूत्रामध्ये हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे गोमूत्राचे सेवन एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. असा दावा भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने (IVRI) केला आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, कोणत्याही व्यक्तीने गोमूत्र पिणे टाळावे त्यामुळे ते आजारी पडू शकतात.

भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने अहवालात दावा केला आहे की, गोमूत्रापेक्षा म्हशीचे मूत्र अधिक प्रभावी आहे. संस्थेचे भोजराज सिंह आणि आयव्हीआरआयमधील पीएचडी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, गाय आणि बैलांच्या मूत्रात 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात. यात असलेल्या एस्चेरिचिया कोलायमुळे पोटात संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे गौमूत्र पिणे टाळावे.

- Advertisement -

या विद्यार्थ्यांनी संशोधन केलेला अहवाल रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. एपिडेमियोलॉजी विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, गाई, म्हशी आणि मानवांच्या 73 लघवीच्या नमुन्यांची तपासणी केली. यात असे दिसून आले की, म्हशीच्या मूत्रातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायींच्या गौमूत्रापेक्षा खूपच चांगला होता.

गोमूत्राची शिफारस मानवांसाठी केली जाऊ शकत नाही
एपिडेमियोलॉजी विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, आम्ही स्थानिक डेअरी फार्ममधून साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी (क्रॉस ब्रीड) या तीन प्रकारच्या गायींचे गोमूत्र, तसेच म्हशी आणि मानवांचे लघवीचे नमुने गोळा केले. या लघवीवर जून ते नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या संशोधनातून असा निष्कर्ष समोर आला की, निरोगी व्यक्तींच्या लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात संभाव्य रोगजनक जीवाणू असतात. त्यामुळे आमच्या संशोधनानुसार गोमूत्राची शिफारस कोणत्याही परिस्थितीत मानवांसाठी केली जाऊ शकत नाही.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे माजी संचालक आर एस चौहान यांनी सांगितले की, मी 25 वर्षांपासून गोमूत्रावर संशोधन करत आहे आणि आम्हाला आढळले आहे की गाळलेल्या गोमूत्रामुळे मानवाची प्रतिकारशक्ती वाढते आणि कर्करोग, कोविड विरूद्ध मदत होते. हे विशेष संशोधन डिस्टिल्ड लघवीच्या नमुन्यांवर केले गेले नाही, जे आम्ही प्रत्यक्षात वापरण्याची शिफारस करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -