Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन उर्फीला जे वाटतं ते तिने करावं... तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

उर्फीला जे वाटतं ते तिने करावं… तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान, अशातच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उर्फी जावेदचं समर्थन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

नुकत्याच एका मुलाखतीत तृप्ती देसाई एका मुलाखतीत उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांना उर्फी जावेदचा एक व्हिडीओ दाखविण्यात आला. ज्यात उर्फीने हिरव्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातला होता. यावर तृप्ती देसाईंनी प्रतिक्रिया दिली की, “उर्फी जावेद ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तिला जसा वेश करायचा आहे, जसे कपडे परिधान करायचे आहेत, तसे ती करू शकते. उर्फीचे कपडे काहींना आवडतात तर काहींना आवडत नाहीत. पण म्हणून तिला सतत विरोध करणं चुकीचं आहे. यातून महिलांबद्दलचे प्रेम, मानसिकता दिसून येते. उर्फीला जे वाटतं ते तिने करावं.”

- Advertisement -

पुढे तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी ज्यावेळी बिग बॉसच्या घरात होते. त्यावेळी माझ्यासोबत अनेक मॉडेल, अभिनेत्री होत्या. त्यावेळी त्या देखील तिथे वेगवेगळे कपडे परिधान करायच्या. पण तेव्हा मला जसं वागायचं होतं. तसंच मी वागले.” असं त्या म्हणाल्या.

 


- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -