घरदेश-विदेशक्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश; दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता

क्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश; दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Subscribe

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसापासून गौतम गंभीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली येथे भाजपमच्या एका कार्यक्रमा दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, गौतम गंभीरला दिल्लीमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी गौतम गंभीरने क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. असे सांगितले जात आहे की, गौतम गंभीर दिल्लीमधऊन निवडणूक लढवू शकतो. यावेळी दिल्लीमध्ये आम आदमी, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सहाव्या टप्प्यात म्हणजे येत्या १२ मे ला मतदान होणार आहे.

- Advertisement -

क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणात येण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्याला विचारण्यात आले होते की, आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे का? तर यावर त्याने नाही असे उत्तर दिले होते. गौतम गंभीरने आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्याने देशभरातील अनेक समस्यांवर ठामपणे आपले मत मांडले आहे.

दिल्लीमध्ये जन्म झालेला गौतम गंभीर टीम इंडियाचा स्टार खेळाडू आहे. त्याने टीम इंडियासाठी ५८ टेस्ट मॅच आणि १४७ वनडे मॅच खेळला आहे. ३७ वर्षाचा गौतम गंभीर वर्ल्ड विजेता टीमचा सदस्य राहिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -