घरदेश-विदेशचीनमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४७ नागरिकांचा मृत्यू

चीनमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४७ नागरिकांचा मृत्यू

Subscribe

चीन मधील एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन ४७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.

चीनमध्ये एका केमिकल कंपनीला आग लागून ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ९० जण जखमी झाले असल्याचे समजते आहे. दरम्यान जखमींना येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर येथे शंभरहून अधिक अग्नीशमन दलाचे अधिकार आग विझवण्याचे काम करत होते. याघटनेत दगावणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या केमीकल कंपनीला लागेल्या आगीमुळे येथे स्फोट झाले होते. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे या परिसरात २.२ तीव्रतेचा भुकंपाचा झटका बसला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी आग लागण्याचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. चीनच्या वेळेनुसार दुपारी दोन वाजता ही घटना घडली आहे. कामाची वेळ असल्यामुळे या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -