घरदेश-विदेशतुम्ही Xiaomi स्मार्टफोन युजर्स आहात; तर ही बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची

तुम्ही Xiaomi स्मार्टफोन युजर्स आहात; तर ही बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची

Subscribe

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र या कंपनीवर आरल्याच युजर्सच्या खासगी डेटावर नजर ठेवल्याचा आरोप होत आहे. एका अहवालानुसार शाओमी स्मार्टफोन युजर्सचा डेटा ही कंपनी त्यांच्या सर्वर वर पाठवत असल्याची धक्क्कादायक माहिती समोर येत आहे. फोर्ब्सने दिलेल्या अहवालानुसार सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट गॅबी सर्लिग यांनी दावा केला आहे की शाओमीच्या वेब ब्राउजनसहीत सर्व अॅप्स युजर्सच्या सहमतीशिवाय मोबाइलमधील सर्व डेटा कॉपी करून सर्वरवर अपलोड केला जात आहे.

हेही वाचा – LockDown : तेलंगणात अडकलेल्या कामगारांची पहिली ट्रेन धावली!

- Advertisement -

शाओमीच्या रेंटेड सर्वरवर सर्व डेटा सेंड 

गॅबी सर्लिग यांच्याकडे सध्या ही बाब सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाओमी कंपनीवर अशा प्रकारचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप झालेले आहेत. रेडमी नोट ८ स्मार्टफोन युजर्सच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच ते शाओमीच्या रेंटेड सर्वरवर सर्व डेटा पाठवत आहेत, असे या माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे त्यांची ओळख आणि खासगी माहिती ही स्मार्टफोन मेकर म्हणजेच शाओमीपर्यंत पोहोचत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -