घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात अफवांचा पाऊस; घाबरु नका, शहरात करोनाचा नवीन पेशंट नाही

नाशकात अफवांचा पाऊस; घाबरु नका, शहरात करोनाचा नवीन पेशंट नाही

Subscribe

बाधित पोलीस बांधवांच्या संपर्कातील व्यक्तींची ठिकठिकाणी आरोग्य तपासणी; अ‍ॅम्बूलन्स बघून संबंधित परिसरांमध्ये भीतीचे वातावरण

महापालिकेचे वैद्यकीय पथके शुक्रवारी (दि.१) शहरातील ठिकठिकाणी दिसून आल्याने संबंधित परिसरात भीती पसरली आहे. ‘आपल्या परिसरात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे का? आपला परिसरही आता सील होईल का असे प्रश्न यानिमित्ताने नागरिकांना पडत आहे. या विषयी ‘आपलं महानगर’ने वैद्यकीय विभागाकडून माहिती जाणून घेतली असता शहरात शुक्रवारी (दि.१मे) सायंकाळपर्यंत एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाला नसल्याची दिलासादायक बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार मालेगावात आढळून आलेल्या ४० करोनाबाधित पोलिसांपैकी २२ पोलीस नाशिक शहरातील रहिवाशी आहेत. मात्र त्यातील केवळ तीन पोलीस गेल्या १५ दिवसांत त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची करोना टेस्ट डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात करण्यात आली असून त्यांना रुग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांच्या संपर्कातील व्यक्ती तसेच उर्वरित पोलीस कुटुंबियांचीही महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. मात्र नागरिकांना ही बाब माहित नसल्याने महापालिकेच्या अ‍ॅम्बुलन्स दिसताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ‘आपलं महानगर’ प्रतिनिधींनाही शुक्रवारी वेगवेगळ्या भागातून माहिती विचारणारे फोन येत होते. त्याचे निराकरण करण्यासाठी वैद्यकीय विभागाकडून माहिती घेतली असता, शहरात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याची दिलासादायक बाब पुढे आली.

पोलीसांची घरे असणारा परिसर सील करणार नाही-

pulse oximeter use for coronavirus detection in ghatkopar

- Advertisement -

संबंधित पोलीसांची हिस्ट्री आम्ही तपासली असून त्यात तीन पोलीस त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आले होते असे निदर्शनास आले. त्यामुळे नियमाप्रमाणे या कुटुंबियांची करोना टेस्ट आम्ही केली आहे. त्यासाठी कुटुंबियांना डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आले अशा अन्य लोकांचीही वैद्यकीय तपासणी आम्ही करीत आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. नवीन कोणताही परिसर आम्ही सील केलेला नाही आणि तसा विचारही नाही. नवीन रुग्ण आढळून आल्यास मात्र संबंधित परिसर सील करण्यात येईल. वैद्यकीय पथक एखाद्या कुटुंबाकडे गेले म्हणजे तेथे पॉझिटिव्ह रुग्ण असतोच असे नाही. आम्ही खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करीत असतो.
डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

शहरात सहा परिसर सील

शहरात आजवर नवीन नाशिक, गोविंदनगर जवळील मनोहरनगर, नवशा गणपती मंदिर, नाशिकरोड, सातपूर-अंबड लिंकरोड आणि समाजकल्याण कार्यालय परिसरात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रविवारी (दि. २६) किशोर सूर्यवंशी मार्ग परिसरात राहणारा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. महापालिकेने संबंधित परिसर सील केला आहे.

- Advertisement -

आजवर जिल्ह्यात २९८ रुग्ण-

१०- नाशिक महापालिका क्षेत्रात; ३ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला१२- नाशिक ग्रामीण क्षेत्रात; २ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला
२७४- मालेगावमध्ये; त्यातील ७ रुग्ण बरे झाले तर १२ रुग्णांचा मृत्यू
२९८- नाशिक जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या

 

नाशकात अफवांचा पाऊस; घाबरु नका, शहरात करोनाचा नवीन पेशंट नाही
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -