घरदेश-विदेशManohar Joshi : शरद पवारांची अशीही खेळी; मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद देण्यातही हात

Manohar Joshi : शरद पवारांची अशीही खेळी; मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद देण्यातही हात

Subscribe

'आधारवड' या पुस्तकात शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 86व्या वर्षी मनोहर जोशींनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान मनोहर जोशींची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी हे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खास मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना-भाजपा युतीच्या पहिल्या विजयानंतर मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केल्याचे दावा ‘आधारवड’ या पुस्तकात करण्यात आले. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आधारवड’ या पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘आधारवड’ या पुस्तकात शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले.

- Advertisement -

‘आधारवड’ या पुस्तकात मनोहर जोशी मुख्यमंत्री करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिल्याचा उल्लेख आहे. 1995 मध्ये शिवसेना-भाजपाच्या पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर सुधीर जोशींना मुख्यमंत्री पदाच्या नाववर शिक्कामोर्तब झाला होता. पण मनोहर जोशींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा सल्ला शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला. या पुस्तकात मनोहरपंत मुख्यमंत्री झाले, असा उल्लेख केला आहे. शरद पवार याच्या राजकीय प्रवासावर लिहिण्यात आलेले पुस्तक ‘आधारवड’ हे सध्या त्यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या अजित पवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्यासह निरंजन डावखरे, प्रसाद लाड आणि हेमंत टकले यांच्या मदतीने पुस्तक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : मराठ्यांना वेगळे आरक्षण मिळाले, आता आंदोलन कशासाठी? भुजबळांचा जरांगेंना सवाल

- Advertisement -

पुस्ककात नेमके काय लिहिले?

‘आधारवड’ या पुस्तकात ‘पवारांच्या जीवनातील 55 वर्षांतील महत्त्वाची घटना’ अशा मथळ्याखाली प्रकरणात मनोहर जोशींचा मुख्यमंत्री होण्याचा उल्लेख केला गेला आहे. मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री पद कसे मिळाले? याचा उल्लेख करताना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पवारांवर टीका केली होती, असे म्हटले आहे. त्यावेळी बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी लक्ष्य केले होते. यानंतर शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदावर चर्चा सुरू होती. तेव्हा बाळासाहेबांनी शरद पवारांच्या सल्ला ऐकून मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, असे आधारवड पुस्तकात म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे विरोधी विचारसरणीचे नेते होते तरी त्यांच्या खूप चांगली मैत्री होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -