घरक्राइमपीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 कोटींची मागितली खंडणी

पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी; 500 कोटींची मागितली खंडणी

Subscribe

ष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाही उडवण्याची धमकी मिळाली आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाही उडवण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणार्‍याने 500 कोटी रुपये आणि तुरुंगात असलेल्या डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेची मागणी केली आहे. एनआयएने पंतप्रधान सुरक्षा आणि इतर राज्यांच्या पोलिसांना याबाबत सूचित केलं आहे. (Death threat to PM Narendra Modi 500 crore ransom demanded with lawrence bishnoi )

धमकीचा मेल आल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्याच वेळी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा उद्घाटन सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. त्याचबरोबर हा ईमेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून आला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

धमकीच्या ईमेलनंतर मुंबई पोलीस सतर्क

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना धमकीच्या ईमेलबाबत अलर्ट केले आहे. गुजरात पोलिसांव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांना ही माहिती शेअर करण्यात आली आहे. हा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनीही सुरक्षा वाढवली आहे. वास्तविक, शहरातील वानखेडे स्टेडियम पाच विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या यजमानपदासाठी सज्ज आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने लिहिले की, ‘आम्हाला तुमच्या सरकारकडून 500 कोटी रुपये आणि लॉरेन्स बिश्नोई हवे आहेत, अन्यथा उद्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देऊ. भारतात सर्व काही विकले जाते म्हणून आम्ही देखील काहीतरी विकत घेतले आहे. तुम्ही स्वतःचे कितीही रक्षण केले तरी तुम्ही आमच्यापासून सुटू शकणार नाही. बोलायचे असेल तर या मेलवरच बोला.

- Advertisement -

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून आपली टोळी चालवतो

लॉरेन्स बिश्नोई 2014 पासून तुरुंगात आहे. कारागृहातून तो सतत आपली टोळी चालवत होता. पंजाबमध्ये त्याच्यावर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी, त्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

(हेही वाचा: गोरेगाव अग्नीकांडाची होणार उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -