घरदेश-विदेश२६ जानेवारीचं सत्य बाहेर येणार? दीप सिद्धूला ७ दिवस पोलीस कोठडी

२६ जानेवारीचं सत्य बाहेर येणार? दीप सिद्धूला ७ दिवस पोलीस कोठडी

Subscribe

ट्रॅक्टर मोर्चातील हिंसक आंदोलनातील आरोपी दीप सिद्धूला अखेर अटक करण्यात आली आहे. २६ जानेवारीला दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक आंदोलनात तो सामील होता. चिथावणीखोर भाषण केला तसेच ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप दीप सिद्धूवर आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून दीप सिद्धू १४ बेपत्ता होता परंतु दिल्ली पोलीस स्पेशल सेलने दीप सिद्धीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दीप सिद्धूवर २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मागील १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याने दिल्ली पोलीस त्याच्या मागोव्यावर होते. दीप सिद्धू बेपत्ता होता तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि फोटो शेअर करत होता. तसेच या आंदोलनावर आपली भूमिकाही मांडत होता.

दीप सिद्धू व्हिडिओ आणि फेसबुकवरुन संवाद साधूनही दिल्ली पोलीसांना सापडत नव्हता परंतु आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला अटक केली आहे. दीप सिद्धूला सोमवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी करनाल बायपासजवळ अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपी दीप सिद्धूला कोर्टाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडून आरोपी दीप सिद्धूसाठी १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतु कोर्टाने त्याला ७ दिवस पोलिस कोठडी ठोवण्यात आली आहे. सिद्धूला शोधून देणाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस ठेवले होते. याप्रकरणी आरोपी सिद्धूची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. दिल्ली पोलीस डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेकडून सिद्धूच्या या प्रकरणातील भूमिकेची सखोल चौकशी करणार आहेत. तसेच २६ जानेवारीला झालेल्या हिंसेच्या घटनेनंतर तो कुठे लपून बसला होता असा प्रश्न चौकशीत विचारला जाणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात सिद्धूची चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

लाल किल्ल्यावर २६ जानेवारीला जो ध्वज फडकवण्यात आला त्यावेळेस दीप सिद्धूही तिथे उपस्थित होता असे बोलले जात आहे. दीप सिद्धूच्या अटकेनंतर चौकशीदरम्यान अधिक माहीती मिळण्याची शक्यता आहे. लाल किल्ला हे सांस्कृतिक ठिकाण आहे त्यामुळे त्या ठीकाणी काही कारवाई केली तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दीप सिद्धूवर दिल्ली पोलिसांकडून धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे.

- Advertisement -

दीप सिद्धू हा पंजाबी गायक, अभिनेता आहे. दीप सिद्धूवर ट्रॅक्टर मोर्चातील आंदोलकांना भडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील १४ दिवसांपासून दिप सिद्धू हा बेपत्ता होता. परदेशातील काही जण दीप सिद्धूला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -