घरताज्या घडामोडीदिल्ली विधानसभा: भाजपने मानली आपली हार? कार्यालयाबाहेर लावले पोस्टर

दिल्ली विधानसभा: भाजपने मानली आपली हार? कार्यालयाबाहेर लावले पोस्टर

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या सुरु आहे. आपने आपली सत्ता राखली असल्याचे प्राथमिक कलावरुन दिसत आहे. आपने सध्या बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर दुसरीकडे भाजपचे दिल्ली येथील कार्यालय ओस पडले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर एक बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर लिहिलेला संदेश सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवल लिहिले आहे, “विजय से हम अहंकारी नही होते और पराजय से निराश नहीं होते”. तसेच या पोस्टरवर अमित शाह यांचा फोटो दर्शविण्यात आलेला आहे.

या पोस्टरवरुन भाजपची बॉडी लँग्वेज दिसून येत आहे. सुरुवातीचे निकाल यायला लागल्यापासूनच भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे का? असा प्रश्न यातून निर्माण होतो. तसेच मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलने देखील आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे सांगितले होते.

- Advertisement -

मागच्यावेळेस २०१५ साली जेव्हा दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा देखील आपने ७० पैकी ६७ जागा जिकंत मजबूत सरकार बनवले होते. भाजपला केवळ ३ जागा तर सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -