घरदेश-विदेशपतीच्या विवाहबाह्य संबंधांचा पत्नीच्या मानसिकतेवर होतो परिणाम; उच्च न्यायालयाचं निरीक्षण

पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा पत्नीच्या मानसिकतेवर होतो परिणाम; उच्च न्यायालयाचं निरीक्षण

Subscribe

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध कळले तर त्या महिलेच्या मानसिक तसंच भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

अहमदनगर: लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध कळले तर त्या महिलेच्या मानसिक तसंच भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. एका आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार देताना, न्यायालयानं ही महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे. (Delhi high court A husband s extramarital affairs affect his wife s psyche High Court observation)

High Court ने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, लग्न होताच नवऱ्याचे अफेअर पत्नीला समजल्यास तिच्या मानसिक व भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. ज्या व्यक्तीच्या पत्नीनं लग्नाच्या अवघ्या 13 दिवसांनी आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास नकरा दिला आहे.

- Advertisement -

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मी म्हणाले, सध्याच्या प्रकरणात असं आढळून आलं आहे की, लग्नानंतर लगेचच नवऱ्याचं अफेअर असल्याचं समजल्यानं पीडितेच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर आणि विनाशकारी परिणाम होतो. महिलेची भावना जबरदस्त असू शकते, कारण महिलेने विश्वास आणि आशेने लग्न केलं असावं. मात्र, पतीच्या कथित विवाहबाह्य संबंध असल्याचं समजल्यानं ती पूर्णपणे खचून गेली असावी. विवाहाच्या एका दिवसानंतर मृत महिलेला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्याची उच्च न्यायालयाने दखल घेतली. अफेअर आणि त्यानंतर पतीकडून होणाऱ्या वाईट वागणुकीमुळे होणाऱ्या भावनिक अपघातामुळे संबंधित महिला आत्महत्येचं पाऊल उचलू शकते, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

( हेही वाचा: Chandrayan-3 : असा होता चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास; वाचा-कधी काय घडले? )

- Advertisement -

न्यायालयाचं निरीक्षण काय?

न्यायालयानं म्हटलं की, आरोपी पतीला जामीन देण्यासाठी पुरेसे कारण नाही. नवविवाहित पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप पतीवर करण्यात आला आहे. 18 मे 2022 रोजी या जोडप्याचं लग्न झालं होतं. महिलेनं गेल्या वर्षी 30.31 मे च्या मध्यरात्री पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रणजित नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या मुलीच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. मात्र, बचाव पक्षाकडून पती निर्दोष असल्याचे सांगत पत्नीच्या आत्महत्येशी पतीचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. उलट पतीला पत्नीच्या आत्महत्येमुळे धक्का बसला होता, असंही म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -