घरदेश-विदेशतिहार तुरुंगात 5 कैद्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:ला जखमी करत घेत होते...

तिहार तुरुंगात 5 कैद्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:ला जखमी करत घेत होते गळफास

Subscribe

तिहार तुरुंग क्रमांक ३ मध्ये मंगळवारी पाच कैद्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले 5 कैदी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली होती, मात्र कारागृह कर्मचाऱ्यांना वेळीच याची माहिती मिळाल्याने पाचही कैद्यांचे प्राण वाचण्यात यश आले आहे. यापैकी एका कैद्याला उपचारांसाठी डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या कैद्यांनी एकत्र आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत.

तिहार तुरुंग क्रमांक 3 मध्ये घडली घटना

तिहार तुरुंग क्रमांक 3 मध्ये मंगळवारी पाच कैद्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी कैद्यांनी धारदार वस्तूंनी स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घेतल्या, यानंतर सर्वांनी आपापल्या वॉर्डमध्ये गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तैनात असलेल्या तुरुंग कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाली. यावेळी तुरुंग कर्मचाऱ्यांनी आवाज देत कैद्यांचा वॉर्ड तात्काळ खुला करत सर्वांचे प्राण वाचवले आहे.

- Advertisement -

कैद्यांवर रुग्णालयात उपचार सुरु

या घटनेची माहिती कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तर सर्व जखमी कैद्यांना प्रथम कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका कैद्याची प्रकृती गंभीर असून त्याला डीडीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाचवेळी पाचही कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कारागृहात प्रथमचं घडली आहे. एकट्या कैद्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र नवीन सीसीटीव्ह कॅमेरे बसवल्यानंतर अनेक कैद्यांचे प्राण वाचवणे शक्य होत आहेत.

सामूहिक आत्महत्येचा प्रयत्नाबाबत कोणतीही माहिती नाही- जेल डीजी

तिहार तुरुंगाचे डीजी संदीप गोयल यांनी कैद्यांच्या दुखापतीबाबत माहिती असल्याचे सांगितले. परंतु, त्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची त्यांना माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाचही कैदी तिहारच्या तुरुंग क्रमांक-3 मधील वॉर्ड क्रमांक-1 चे आहेत. या कैदींनी आधी स्वत:ला जखमी केले आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कैद्यांनी भविष्यात असे पाऊल उचलू नये म्हणून सर्व कैद्यांचे समुपदेशन केले जाईल. असे तुरुंग प्रशासन सांगितले आहे. कारागृहात असताना कैद्यांचा इतिहास काय, यापूर्वी कोणी असा प्रयत्न केला आहेत का, याचीही माहिती घेतली जाणार आहे.


Weather Update : दिल्लीसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, वीकेंडला पावसाचा जोर वाढणार, IMD चा इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -