घरताज्या घडामोडीTraffic Challan : सावधान ! आता फक्त हॉर्न वाजवल्याने 4000 रुपयांचे चालान...

Traffic Challan : सावधान ! आता फक्त हॉर्न वाजवल्याने 4000 रुपयांचे चालान कापले जाणार

Subscribe

रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थितरित्या आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहण्यासाठी वाहतुकीचे काही नियम करण्यात आले आहेत.याशिवाय जर नियमांचे पालन केलात तर, वाहतुक पोलिसांकडून कापले जाणाऱ्या चालानपासून वाचू शकता. मात्र जर वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर, ट्रॅफिक पोलिस तुमचे चालान कापू शकते.

वाहने चालवताना प्रत्येकालाच शिस्तीचे पालन करावे लागते. त्यामुळे वाहनाने रस्त्यावर प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. या नियमांचे पालन केल्याने तुमचा प्रवास सुरक्षित आणि त्यातून तुम्हांलाच काही फायदे होऊ शकतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थितरित्या आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहण्यासाठी वाहतुकीचे काही नियम करण्यात आले आहेत. याशिवाय जर नियमांचे पालन केलात तर, वाहतूक पोलिसांकडून कापले जाणाऱ्या चालानपासून वाचू शकता. मात्र जर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर, ट्रॅफिक पोलिस तुमचे चालान कापू शकते.

केंद्र सरकारने लागू केलेल्या काही नव्या मोटर नियमांनुसार, चालान कापून घ्यायचा दंड खूप जास्त आहे. त्यामुळे वाहनाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असतो. मात्र, कधी कधी आपण वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत याची कोणालाही कल्पना नसते. वाहतूक पोलिसांनी पकडल्यावरच अनेकदा आपण केलेल्या चुकीची जाणीव होते. मात्र, हा वाहतूक प्रवास करणारा असा एक नियम आहे ज्याची कोणालाही माहिती नाही. हा नियम ट्राफिकमध्ये डोक्याला ताण देणाऱ्या हॉर्नशी संबंधित आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल मात्र, हॉर्न वाजवण्याशी संबंधित एक नियम असून, या नियमांचे उल्लंघन केल्याने तुमचे चालान कापले जाऊ शकते.

- Advertisement -

जर तुम्ही ‘नो हॉर्न झोन’मध्ये असाल आणि हॉर्न वाजवला तर तुमचे चालान कापले जाऊ शकते. यासाठी वाहतूक पोलिस तुमचे 4000 रुपयांपर्यंतचे चालान कापले जाऊ शकते.त्यामुळे तुम्ही जर ‘नो हॉर्न झोन’मध्ये असाल तर अजिबात हॉर्न वाजवू नका. हॉर्नऐवजी तुम्ही तुमच्या कारचे डिपर वापरू शकता. तुम्ही हॉर्न वाजवून जे काम करू शकता तेच काम डिपरद्वारे केले जाऊ शकते.


हेही वाचा – तिहार तुरुंगात 5 कैद्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:ला जखमी करत घेते होते गळफास

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -