घरदेश-विदेशWeather Update : दिल्लीसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, वीकेंडला पावसाचा जोर वाढणार,...

Weather Update : दिल्लीसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, वीकेंडला पावसाचा जोर वाढणार, IMD चा इशारा

Subscribe

थंडीची लाट ओसरली असून पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून दिल्लीत पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्र लाट पसरली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात सतत घट होताना दिसतेय. यात महाराष्ट्रासह दिल्ली गारठत आहे. दरम्यान राजधानी दिल्ली आणि मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे थंडीची लाट ओसरली असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून दिल्लीत पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातही पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.


दिल्लीत ही पावसाची परिस्थिती आठवड्याच्या शेवटपर्यंत कायम राहतील तर पुढील आठवड्यातही हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. दिल्ली, एनसीआरमध्येही 7 जानेवारी आणि 8 जानेवारीला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दिल्लीत मध्यम आणि सौम्य स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यातही आजपासून ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे आगामी 24 तासात या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर 7 जानेवारीनंतर राज्यात हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे. शुक्रवारी नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच 8 ते 9 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


surat gas leak : सुरतमध्ये गॅस गळती; 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू, 25 जणांची प्रकृती चिंताजनक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -