घरदेश-विदेशबेपत्ता महिलेच्या तपासासाठी पोलिसाने दाखवली ज्योतिषाला कुंडली

बेपत्ता महिलेच्या तपासासाठी पोलिसाने दाखवली ज्योतिषाला कुंडली

Subscribe

सुलक्षणा नरुला सापडतील की नाही हे जाणून घेण्यासाठी याप्रकरणाचे तपास अधिकारी विजय यांनी महिलेच्या कुंडलीसह स्वत:ची देखील कुंडली ज्योतिषाला दाखवली आहे.

दिल्लीमधील एअर इंडियाची मॅनेजर गेल्या ८ महिन्यापासून बेपत्ता आहे. सुलक्षणा नरुला (५८ वर्ष) असं या महिलेचे नाव असून दिल्ली पोलीस या महिलेचा शोध घेत आहे. मात्र महिलेचा अद्याप तापस न लागल्यामुळे अखेर दिल्ली पोलीस ज्योतिषाच्या शरण आले आहे. सुलक्षणा नरुला सापडतील की नाही हे जाणून घेण्यासाठी याप्रकरणाचे तपास अधिकारी विजय यांनी महिलेच्या कुंडलीसह स्वत:ची देखील कुंडली ज्योतिषाला दाखवली आहे. ज्योतिषाने दोन्ही कुंडलीचा अभ्यास करुन महिला सापडण्याचा योग सांगितला आहे. या ज्योतिषाने याप्रकरणात महादोष असल्याचे सांगत १९ एप्रिलला महादोष असून तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काहीच होणार नसल्याचे ज्योतिषाने सांगितले आहे. बेपत्ता असलेल्या महिलेचा मुलगा अनुभव नरुला याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. मात्र पोलिसांनी यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुलक्षणा ८ महिन्यापासून बेपत्ता

अनुभवने सांगितेल की, पोलिसांनी आमच्याकडून आईची कुंडली मागितली होती. त्यांनी आईची कुंडली एका ज्योतिषाला दाखवली. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक उपाय करण्याचा सल्ला दिला. छतरपूर मंदिरामध्ये देवाची पूजा करण्यास त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे लाडू आणि पिवळ्या रंगांची फूल देवाला वाहण्यास सांगितले होते. पोलिसांनी जसे सांगितले तसे आम्ही केले. देवाची पुजा देखील केली. तसंच पोलिसांनी सांगितेल की, कुंडलीमध्ये माझी आई सापडण्याचा योग आहे. मात्र ती कधीपर्यंत भेटेल याबाबत त्यांनी स्पष्ट काहीच सांगितले नाही. अनुभवने पुढे असे देखील सांगितले की, जसा जसा वेळ जात आहे तसा पोलीस तपासात दिरंगाई होत आहे. माझ्या आईबाबत माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा देखील केली होती.

- Advertisement -

आईच्या शोधासाठी मुलाने तयार केले मोबाईल अॅप

सुलक्षणा नरुला यांचा मुलगा अनुभव हा इंजिनिअर आहे. आईच्या शोधासाठी अनुभवने दिल्लीच्या एनसीआर भागामध्ये दोन लाख पत्रक वाटली. टेक्नॉलॉजिच्या मदतीने आईला शोधण्यासाठी त्याने हेल्प फाइंड सुलक्षणा नरुला नावाचे मोबाईल अॅप तयार केले. हा अॅप पोलीस आणि तपास यंत्रणांसाठी त्याने बनवला होता. ऐवढे प्रयत्न करुन देखील त्याची आई अद्याप सापडली नाही.

एअरपोर्ट कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी

सुलक्षणा यांचे पती डॉ. सुनील नरुला यांनी पोलिसांकडे एक मागणी केली आहे. याप्रकरणाच्या तपासामध्ये सुलक्षणा यांच्यासोबत काम करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत काहीतरी माहिती या सर्वांच्या तपासातून मिळू शकते असे डॉ. सुनिल यांना वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -