घरदेश-विदेशहा माजी पंतप्रधान म्हणाला, मी सुद्धा 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'

हा माजी पंतप्रधान म्हणाला, मी सुद्धा ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’

Subscribe

डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या जीवनावर बेतलेल्या 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी एका माजी पंतप्रधाने स्वतःला 'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' म्हणून संबोधले आहे.

अभिनेते अनुपम खेर यांचा अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या चित्रपटाद्वारे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हटले गेले आहे. मात्र अजून एक माजी पंतप्रधान स्वतःला अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणत आहेत. कर्नाटकचे नेते, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय बारू यांच्या अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर आधारीत याच नावाचा चित्रपट बनवण्यात आला आहे. बारू हे २००४ ते २००८ दरम्यान डॉ. मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम करत होते.

हे वाचा – अनुपम खेर चित्रपटावर ठाम, काँग्रेसच्या विरोधाकडे दुर्लक्ष!

मागच्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसने चित्रपटावर टीका करायला सुरुवात केली. जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, “या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोण परवानगी देत आहे, हे मला माहीत नाही. खरं सांगायचे तर चित्रपटातल्या तथाकथित अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरबद्दल मला माहीत नाही. पण मी स्वतःला अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर समजतो.”

- Advertisement -

अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. यामध्ये मनमोहन सिंह यांचे पात्र अनुपम खेर यांनी रंगवले तर अक्षय खन्नाने संजय बारू यांचे पात्र निभावले आहे. ११ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

देवेगौडा १९९६ साली पंतप्रधान बनले

१९९६ साली लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळवता आले नव्हते. त्यावेळी काँग्रेस आणि भाजप पक्षाला वगळून प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत सरकार बनवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसला सोबत घेऊन प्रादेशिक पक्षांनी देवेगौडा यांना पंतप्रधान बनवले होते. १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ पर्यंत पंतप्रधान पदावर आरूढ होते. मात्र नंतर काँग्रेसने आपले समर्थन काढून घेतल्यामुळे देवेगौडा यांना पायउतार व्हावे लागले होते.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -