घरदेश-विदेशकोलकात्यात सापडला दुसऱ्या महायुद्धातील ४५३ किलोचा अवाढव्य बॉम्ब

कोलकात्यात सापडला दुसऱ्या महायुद्धातील ४५३ किलोचा अवाढव्य बॉम्ब

Subscribe

दुसऱ्या महायुद्धात हवाई हल्ला करण्याचा शोध लागला होता. याच महायुद्धातला एक अवाढव्य बॉम्ब कोलकाता बंदराजवळ सापडला आहे.

दुसऱ्या महायुद्धात विमानातून बॉम्बहल्ला करण्याचा शोध लागला होता. यातला एक बॉम्ब कोलकाता बंदराजवळ सापडला आहे. या बॉम्बचे वजन ४५३ किलो असून बंदरावर खोदकाम करत असताना हा बॉम्ब सापडला. त्यानंतर बॉम्ब पाहण्यासाठी इथे लोकांची झुंबड उडाली होती. बॉम्ब सापडल्याची माहिती पोलीस, नौदल आणि सैनिक प्रशासनाला दिली असल्याचे कोलकाता बंदराचे अध्यक्ष विनित कुमार यांनी सांगितले.

या बॉम्बची लांबी ४.५ मीटर असून त्याचे वजन १००० पाऊंड म्हणजेच ४५३ किलो इतके आहे. दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता खोदकाम करत असताना हा बॉम्ब आढळून आला, असेही विनित कुमार यांनी सांगितले. कोलकाता बंदरावर असलेल्या नेताजी सुभाष हे डॉक दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी अमेरिकेच्या नौदलाने वापरले होते. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील असून अमेरिकेनेच तो बनवला असल्याचे भारतीय सैन्य दलाने ओळखला आहे. सुरुवातील आम्हाला हा टोरपॅडो वाटला होता, पण नंतर तो बॉम्ब असल्याचे कळले, असे कोलकाता बंदरातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या बॉम्बला निकामी करण्यासाठी आमचे वेगवान प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

हे वाचा – गुप्तांग छाटलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

हा बॉम्ब निकामी करायचा राहिला असला तरी त्यापासून कोणताही धोका नाही. कारण त्याचे लॉक अजूनही अस्तित्वात आहेत, असे पश्चिम बंगालचे नौदल प्रमुख सुप्रभू के डे यांनी सांगितले. तसेच आकाशातून फेकण्यात येणारे बॉम्ब तेव्हाच काम करतात जेव्हा त्यांना एका निश्चित उंचीवरुन फेकण्यात येते, असेही या नौदल अधिकाऱ्यांने सांगितले.

हा बॉम्ब बंदराजवळ कसा आला, हे सध्यातरी सांगता येणार नाही. कदाचित अनेक वर्ष तो पाण्याखाली होता. एखाद्या बोटीतून या बॉम्बला नेण्यात येत असावे आणि नदी किंवा समुद्रात बोट बुडाल्यानंतर तो पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता बंदर प्रमुख विनित कुमार यांनी वर्तवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -