घरताज्या घडामोडीYoutube Channel Blocked : अपप्रचार करणाऱ्या १६ यूट्यूब चॅनेल्सला मोदी सरकारचा दणका,...

Youtube Channel Blocked : अपप्रचार करणाऱ्या १६ यूट्यूब चॅनेल्सला मोदी सरकारचा दणका, ६ पाकिस्तानातून होते कार्यरत

Subscribe

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार करणाऱ्या १६ यूट्यूब चॅनेल्सला मोदी सरकारने चांगलाच दणका दिला आहे. या १६ यूट्यूब चॅनेल्सपैकी १० भारतातील आणि ६ पाकिस्तानातून कार्यरत होते. भारत सरकारने आयटी नियम २०२१ कायद्या अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून हे यूट्यूब चॅनेल्स ब्लॉक करून टाकले आहेत.

हे यूट्यूब चॅनेल्स देशविरोधातील विचार, जातीय द्वेष आणि भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या चॅनेल्सचे ६८ कोटींहून अधिक सदस्य होते. ५ एप्रिल रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार करणारे २२ यूट्यूब चॅनेल्स ब्लॉक केले होते. आयटी नियम २०२१ अंतर्गत पहिल्यांदाच १८ भारतीय युट्यूब चॅनेल्स ब्लॉक करण्यात आले होते. दरम्यान पाकिस्तानमधले चार यूट्यूब चॅनेल्सही ब्लॉक करण्यात आले होते.

- Advertisement -

काही यूट्यूब चॅनेल्सने लोगो आणि टीव्ही न्यूज चॅनेलच्या बनावट लघुप्रतिमांचा वापर केला. याशिवाय ३ ट्विटर अकाऊंट, १ ​​फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे. भारत सरकारने ५ एप्रिल रोजी ब्लॉक केलेल्या यूट्यूब चॅनेलच्या दर्शकांची संख्या २६० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले होते. राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि सुनियोजित प्रचार करण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जात होता, यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Hanuman Chalisa Row: दादागिरी करून याल तर… नकली हिंदुत्ववाद्यांचा समाचार लवकरच सभेतून घेणार – मुख्यमंत्री


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -