घरताज्या घडामोडीDonkey : गाढवाचे मटण अन् दूधही गुणकारी, तरीही महाराष्ट्रासह देशाभरात गाढवांच्या संख्येत...

Donkey : गाढवाचे मटण अन् दूधही गुणकारी, तरीही महाराष्ट्रासह देशाभरात गाढवांच्या संख्येत मोठी घट

Subscribe

कोरोनाच्या महामारीच्या काळात गाढवीणीच्या दुधाला जगभरासह भारतातही मोठा भाव आला. या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात इम्युनिटी वाढवण्याची क्षमता असल्याने या दुधाला देशात अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये गाढवणीच्या दुधासाठी अनेक राज्यात मागणी वाढलेली दिसली. देशातील अनेक राज्यांमध्ये गाढवांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आढळत आहे. एकेकाळी मालवाहतूक करण्यासाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. पण दळणवळणाची साधने वाढली तसा या वाहतुकीच्या कामासाठी गाढवांचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले. पण गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये गाढवांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसते आहे. गेल्या सात वर्षांमध्ये गाढवांच्या संख्येत झालेली घट ही लक्षणीय आहे. २०१२ ते २०१९ या वर्षामध्ये गाढवांच्या संख्येत ६१.२३ टक्के इतकी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे.

गाढवांची मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक घट ही उत्तर प्रदेशातून दिसून आली आहे. उत्तर प्रदेशात २०१२ मध्ये गाढवांची संख्या ५७ हजार होती, हीच संख्या २०१९ मध्ये १६ हजार इतकी आहे. जवळपास ७१.७२ टक्के इतकी मोठी ही घट आहे. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये ७१ टक्के इतकी मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. राजस्थानमध्ये २०१२ मध्ये ८१ हजार गाढवांची संख्या २०१९ मध्ये २३ हजार इतकी झाली आहे. तर गुजरातमध्ये गाढवांच्या संख्येत ७०.९४ टक्के इतकी घट आली आहे. गुजरातमध्ये २०१२ साली ३९ हजार गाढवांची संख्या होती, या संख्येत घट होताना ११ हजार इतकीच गाढवांची संख्या उरली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र, बिहारमध्ये किती घट ?

बिहारमध्ये गाढवांच्या संख्ये ४७.३१ टक्के घट झाली आहे. याठिकाणी २०१२ मध्ये गाढवांची संख्या २१ हजार होती, ही संख्या २०१९ मध्ये घट होतानाच ११ हजारापर्यंत कमी झाली आहे. महाराष्ट्रातही ३९.६९ टक्के इतकी गाढवांच्या संख्येत घट दिसून आली आहे. महाराष्ट्रात २०१२ मध्ये २९ हजार इतक्या प्रमाणात गाढवांची संख्या होती. या संख्येत घट होतानाच २०१९ मध्ये १८ हजार इतकी कमी झाली आहे. प्राणी जनगणना २०१९ नुसार भारतात एकुण गाढवांची संख्या १.१२ लाख इतकी आहे.

गाढवांची संख्या का घटतेय ?

कोरोनासारख्या महामारीत गाढवीणीचे दुधाचे फायदे दिसून आले असले तरीही गाढवांच्या संख्येत घट होण्यासाठी काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अवैध पद्धतीने गाढवांची इतर देशात होणारी निर्यात हे सर्वात महत्वाचे कारण समोर आले आहे. अनेक देशांमध्ये गाढवाचे मांसदेखील खाल्ले जाते. तर अनेक ठिकाणी गाढवाच्या कातड्याचाही उपयोग केला जातो. अनेक व्यापाऱ्यांकडून अवैध पद्धतीने खरेदी विक्री करण्यात येत असल्यानेच ही संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे महत्वाचे कारण समोर आले आहे. अनेक ठिकाणी गाढवांचा वापर कमी झाला आहे. तर काही ठिकाणी अवैध पद्धतीने होणारी निर्यात आणि मांसासाठी केला जाणारा वापर ही प्रमुख कारणे गाढवांची संख्या कमी होण्यासाठी प्रमुख कारण ठरते आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -