घरताज्या घडामोडीपाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट् उघड; अनेक खुलासे समोर

पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट् उघड; अनेक खुलासे समोर

Subscribe

डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपप्रकरणी ३ मे रोजी कुरुलकरांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली. मात्र, याप्रकरणी आता अधिक माहिती समोर आली आहे. ‘झारा दासगुप्ता’ असे नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर आली आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. कुरुलकरांनी भारताच्या काही क्षेपणास्त्रांविषयी झाराशी चर्चा केल्याचे या चॅटमध्ये उघड झाले आहे.

डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपप्रकरणी ३ मे रोजी कुरुलकरांना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली. मात्र, याप्रकरणी आता अधिक माहिती समोर आली आहे. ‘झारा दासगुप्ता’ असे नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर आली आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. कुरुलकरांनी भारताच्या काही क्षेपणास्त्रांविषयी झाराशी चर्चा केल्याचे या चॅटमध्ये उघड झाले आहे. दरम्यान, एटीएसने याप्रकरणी पुणे न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तब्बल १८३७ पानांचे व्हॉट्सअॅप चॅट जोडल्याची माहिती मिळते. (DRDO Head Dr Pradeep Kurulkar Brahmos Missile Info Zara Dasgupta Pakistan Female Spy)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

प्रदीप कुरुलकरांना ३ मे रोजी एटीएसने अटक केली. कुरुलकरांना एटीएसनं ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टअंतर्गत अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या जाळ्यात अडकून देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती तसेच काही क्षेपणास्त्रांची माहिती दिल्याची बाब समोर आली. या महिला गुप्तहेराने कुरुलकरांना तिचे नाव झारा दासगुप्ता असे सांगितले होते. या दोघांमधये १० जून २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या काळात असंख्य वेळा व्हॉट्सअॅप चॅट झाल्याची बाब त्यांच्या मोबाईलच्या तपासात उघड झाली आहे.

एटीएसने पुणे न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात कुरुलकर व झारा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा सविस्तर उल्लेख आहे. १९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२२ या काळात त्यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत अनेकदा चर्चा झाल्याचे समोर आले. शिवाय, ते सर्वात विद्ध्वंसक ब्रह्मोससुद्धा तूच बनवलं आहेस का बेब? असा प्रश्न झाराने विचारला असता कुरुलकरांनी माझ्याकडे ब्रह्मोसच्या सर्व प्रकारांचे १८६ पानांचे सुरुवातीचे रिपोर्ट्स आहेत. मी त्यांची कॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही कारण ते गोपनीय आहेत. पण मी ते ट्रेस करून तयार ठेवतो. तू इथे आलीस की मी ते तुला दाखवेन, असे कुरुलकरांनी झाराला सांगितल्याचे चॅट्समध्ये उघड झाले आहे. याशिवाय, ब्रह्मोसव्यतिरिक्त कुरुलकर आणि झाराने अग्नी ६, रुस्तम, सॅम, यूसीएव्ही आणि डीआरडीओच्या इतर ड्रोन प्रोजेक्ट्सविषयीही चर्चा केली. क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्च, मीटिऑर मिसाईल, राफेल, आकाश आणि अस्र मिसाईलबाबतही कुरुलकरांनी झाराशी चॅटिंग केल्याचे तपासात उघड झाले. तसेच, डीआरडीओला लागणारे साहित्य पुरवणाऱ्या व भारतीय लष्कराला रोबोटिक उपकरणे पुरवणाऱ्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्याचाही उल्लेख कुरुलकरांनी झाराशी केलेल्या चॅट्समध्ये आहे.

- Advertisement -

एटीएसच्या आरोपपत्रानुसार, कुरुलकरांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेराचा नंबर एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये तिने सांगितलेल्या झारा दासगुप्ता या नावाने सेव्ह न करता हॅप्पी मॉर्निंग या नावाने सेव्ह केला होता. त्यांनी झाराला डीआरडीओच्या दोन वैज्ञानिकांची नावेही कळवली होती. दरम्यान, कुरुलकरांनी झाराशी अग्नी ६ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाविषयीही चर्चा केल्याचं व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसत आहे. या क्षेपणास्त्राच्या लाँचरचं डिझाईन मी तयार केलं आहे. ते प्रचंड यशस्वी झालं आहे, असे कुरुलकरांनी झाराला सांगितले होते. तसेच, अग्नी ६ कधी लाँच केलं जाईल? असा प्रश्न झारानं विचारला असता नाईट फायर करेंगे. थोडा धीरज रखो, असेही कुरुलकरांनी तिला सांगितल्याचे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये उघड झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -