Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश दुबईहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये दारू पिऊन दोघांचा धिंगाणा; पुढे काय घडलं जाणून घ्या

दुबईहून मुंबईला येणाऱ्या फ्लाइटमध्ये दारू पिऊन दोघांचा धिंगाणा; पुढे काय घडलं जाणून घ्या

Subscribe

दुबई-मुंबई इंडिगो विमानात मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे

दुबई-मुंबई इंडिगो विमानात मद्यधुंद अवस्थेत क्रू मेंबर्स आणि सहप्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, विमान मुंबईत उतरल्यानंतर बुधवारी दोघांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांना न्यायालयातून जामीन मिळाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हे कोल्हापूर आणि पालघरमधील नालासोपारा येथील रहिवासी आहेत. एक वर्ष आखाती देशात काम करून ते स्वदेशी( भारत) परतत होते.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, दोन्ही आरोपी भारत देशात परतल्याच्या आनंदात दारू पीत होते.  इतर प्रवाशांनी जेव्हा त्यांच्या या  गोंधळाला आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी त्यांच्यावर तसेच, हस्तक्षेप करणाऱ्या क्रू सदस्यांना शिवीगाळ केली, असे पोलीस अधिका-याकडून सांगण्यात आले.  या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (इतरांच्या जीवाला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणे) आणि विमान वाहतूक नियमांच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , विमानातील प्रवाशांशी केलेल्या या अनुचित वर्तनाची या वर्षातील ही सातवी घटना आहे. यापूर्वी, 11 मार्च रोजी लंडन-मुंबई विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याबद्दल आणि आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

त्या दोघांचा विमानात सुमारे अडीच तास धिंगाणा

विमानात मद्यपान करण्यास मनाई असताना दुबईहून मुंबईत येणाऱ्या दोन प्रवाशांनी मद्यपान केले. कर्मचाऱ्यांनी मनाई करुनही विमान हवेत असताना मधल्या मोकळ्या जागेत ते फिरत होते. रोखण्याचा प्रयत्न करताच दोघांनी शिवीगाळ करत विमानात गोंधळ घातला. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 22 मार्चला पहाटे साडेपाचच्या सुमारास उड्डाण घेतले. सकाळी आठच्या सुमारास दोन प्रवाशी दारु पित असल्याची तक्रार इतर प्रवाशांनी विमानातील कर्मचाऱ्यांकडे केली. विमानातील कर्मचाऱ्यांनी दोनही सीटवर जाऊन प्रवाशांकडे विचारणा केली. दत्ता बापर्डेकर आणि जाॅन डिसुझा अशी नावे सांगणाऱ्या दोन्ही प्रवाशांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

- Advertisement -

( हेही वाचा: पुढच्या २४ तासांत पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा, बळीराजा चिंतेत )

कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता यामध्ये दारुची अर्धी बाटली सापडली. या बाटलीतील दारु घेऊन दोघे पित असल्याचे दिसून आले. कर्मचा-यांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तसेच, मधल्या जागेत येऊन गोंधळ घालू लागले. कर्मचा-यांनी हटकले म्हणून त्यांना शिवीगाळदेखील केली. मुंबईतील विमानतळावर उतरेपर्यंत दोन्ही प्रवाशांचा गोंधळ सुरुच होता. ही बाब विमानातील कर्मचा-यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. विमानातून उतरताच दोन्ही प्रवाशांन सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisment -