घरCORONA UPDATEकाय सांगता! ६० वर्षांनी येणार Covid-19पेक्षा भयंकर महामारी, ड्यूक युनिव्हर्सिटीचा दावा

काय सांगता! ६० वर्षांनी येणार Covid-19पेक्षा भयंकर महामारी, ड्यूक युनिव्हर्सिटीचा दावा

Subscribe

कोरोना महामारी ही आतापर्यंत जगातील सर्वात भयंकर महामारी आहे असे वाटत असले तरी आणखी ८ वर्षांनी देखील याहून भंयकर महामारी येणार

जगभरात २०२० वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाने (Covid-19) थैमान घालते आहे जे गेल्या दीड वर्षांपासून सुरुच आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ३-४ लाटा येऊन गेल्या आहेत. भारतात (India) नुकतीच कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्याची वेळ आली. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीदेखील (Covid-19 Vaccine) उपलब्ध झाल्यात मात्र लसीचे दोन डोस घेऊन देखील लोकांना कोरोनाची लागण होत आहे. अमेरिकेच्या ड्यूक यूनिव्हर्सिटीने (Duke University) कोरोनावर एक नवीन अभ्यास केला आहे ज्यात धक्कायदायक खुलासा करण्यात आला आहे. ६० वर्षांनंतर कोरोनापेक्षा भयंकर महामारी थैमान घालणार आहे ज्यात लोकांचे जगणे कठीण होईल, असे म्हणण्यात आले आहे. (Duke University claims to have a worse epidemic than Corona in after 60 years)

६० वर्षांनी जगात कोरोनापेक्षा भयंकर माहामारी येणार असल्याचा दावा अमेरिकेच्या ड्यूक यूनिव्हर्सिटीकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असे देखील म्हटले आहे की, जगात दरवर्षी एक महामारी पसरण्याची शक्यता आहे. आता पर्यंत म्हटले जात होते की, १०० वर्षांपूर्वी स्पेनिश फ्लू आला होता ज्याने त्या काळात कोरोनासारखे थैमान घातले होते. कोरोना महामारी ही आतापर्यंत जगातील सर्वात भयंकर महामारी आहे असे वाटत असले तरी आणखी ८ वर्षांनी देखील याहून भंयकर महामारी येणार असल्याचा दावा ड्यूट यूनिव्हर्सिटीकडून करण्यात आलाय.

- Advertisement -

ड्यूक यूनिव्हर्सिटीचे डॉ. विलियम पैन यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ आणि स्पॅनिश फ्लू दोन्ही महामारी एकसारख्या आहेत. भविष्यातही अशी महामारी उद्भवणार आहे. ज्यात माणसे आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करू शकणार नाहीत. आतापर्यंत आलेल्या हैजा,स्मॉलपॉक्स,कॉलरा यासारख्या भयंकर महामारीवर आधारावर ड्यूक यूनिव्हर्सिटीने अभ्यास केला होता. या महामारी ज्या अंतराने आल्या त्याच अंतराने ६० वर्षांनी येणारी महामारी ही कोरोनापेक्षा भयंकर असल्याचा दावा ड्यूक यूनिव्हर्सिटीने केला आहे.


हेही वाचा – MPमध्ये ९०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण, याचा कोरोनाशी काही संबंध आहे का?

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -