घरताज्या घडामोडीगेल्या २४ तासांत बरे झाले ७ हजार ४१९ रुग्ण; रिकव्हरी रेट ५१.०८...

गेल्या २४ तासांत बरे झाले ७ हजार ४१९ रुग्ण; रिकव्हरी रेट ५१.०८ टक्के

Subscribe

गेल्या २४ तासांत देशभरात ७ हजार ४१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ७९७ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ७ हजार ४१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ७९७ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर रिकव्हरी रेट ५१.०८ टक्के इतका झाला आहे.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या मृतांची संख्या ३०० हून अधिक आहे. तसेच सलग तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या देखील ११ हजाराहून अधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३२५ जणांचा मृत्यू झाला असून ११ हजार ५०२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ९ हजार ५२०वर तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ५३ हजार १०६ रुग्ण अॅक्टिव्ह असून १ लाख ६९ हजार ७९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७ हजार ९५८वर पोहोचली असून ३ हजार ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून एकूण बाधितांची संख्या ५८ हजार २२६ आहे. तर एकट्या मुंबईत आतापर्यंत २ हजार १८२ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – देशातील ‘या’ शहरात १९ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -