घरताज्या घडामोडीदेशातील 'या' शहरात १९ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन

देशातील ‘या’ शहरात १९ जूनपासून पुन्हा लॉकडाऊन

Subscribe

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी देशातील काही शहरात येत्या १९ जूनपासून लॉकडाऊन जाहिर केले जाणार आहे.

कोरोना विषाणूने जगात अक्षरश: कहर केला आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात चार वेळा लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, असे असताना देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झालेली नाही. तर याउलट दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी देशातील काही शहरात येत्या १९ जूनपासून लॉकडाऊन जाहिर केले जाणार आहे.

या शहरात होणार लॉकडाऊन

मिळालेल्या माहितीनुसार; तामिळनाडूतही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये येत्या १९ जून ते ३० जूनपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवा सुरु

या दरम्यान अत्यावश्यक सेवा, रुग्णालय, चाचणी लॅब आणि वैद्यकीय सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात येणार आहे. तसेच विमान आणि ट्रेन सेवा प्रोटोकॉलनुसार सुरु राहिल. विशेष म्हणजे इमर्जन्सी सोडल्यास टॅक्सी आणि रिक्षांना रस्त्यावर अजिबात परवानगी नसेल. विशेष म्हणजे या काळात गाडयांचा वापर करु नका. तसेच घरापासून दोन किलोमीटरच्या परिसरातूनच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करा, असे आवाहन देखील यंत्रणांनी केले आहे.

सरकारी कार्यालये सुरु

या लॉकडाऊन काळात ३३ टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालये सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: येत्या २१ जूनला कोरोना नष्ट होणार; भारतीय वैज्ञानिकाचा अजब दावा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -