घरदेश-विदेशभारतात दरवर्षी रस्ता अपघातात १.४७ लाख लोकांचा होतो मृत्यू

भारतात दरवर्षी रस्ता अपघातात १.४७ लाख लोकांचा होतो मृत्यू

Subscribe

भारतात दरवर्षी रस्ता अपघातात १ लाख ४७ हजार ९१३ लोकांना मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला रस्ते अपघातासंदर्भात आकडेवारी सादर करण्यात आली. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

भारतात बेदरकारपणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहने चालवण्यात येतात. त्यामुळे रस्ता अपघातांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०१७ साली भारतात दर तासाला ५३ रस्ते अपघात झाले. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात दरवर्षाला सरासरी १ लाख ४७ हजार ९१३ जणांचा मृत्यू होतो, अशी माहितीही त्यातून समोर आली आहे.

- Advertisement -

रस्ता अपघात होण्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त आहे. तर, तामिळनाडू दुसर्‍या स्थानावर आहे. तिसर्‍या स्थानावर महाराष्ट्र आह

विशेष म्हणजे, भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात रस्ता अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. तर अंदमान-निकोबार, दमन-दीव, नागालँड आणि दादर नगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशात रस्ते अपघातात 50 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.

- Advertisement -

रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन(संशोधन) विधेयकात अनेक गाइडलाइन्स घातल्या आहेत. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचा मुख्य उद्देश हे रस्ते अपघात कमी करणे हाच आहे, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या विधेयकाच्या चर्चेदरम्यान लोकसभेत सांगितले. वाहन चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्यामुळेच अनेकांना रस्ते अपघातात आपला प्राण गमवावा लागत आहे. दंडाची रक्कम अधिक कठोर करून वाहनचालकांना नियम पाळण्याची सक्ती करण्याची हे विधेयक आणले असल्याचे नितीन गडकरी यांनी सभागृहात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -